‘भाजपला राममंदिर बांधावेच लागणार’
By Admin | Updated: July 19, 2015 23:51 IST2015-07-19T23:51:07+5:302015-07-19T23:51:07+5:30
विश्व हिंदू परिषदेने पुन्हा एकदा राममंदिराचा राग आळवला आहे. राममंदिर हा महत्त्वाचा मुद्दा असून,

‘भाजपला राममंदिर बांधावेच लागणार’
नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषदेने पुन्हा एकदा राममंदिराचा राग आळवला आहे. राममंदिर हा महत्त्वाचा मुद्दा असून, केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपला मतदारांना दिलेले आश्वासन पाळावेच लागेल, असा इशारा देत या संघटनेने मोदी सरकारवरील दबाव आणखी वाढवला आहे.
भाजपच्या जाहीरनाम्यात अन्य मुद्यांसोबत राममंदिराचा मुद्दाही समाविष्ट होता. मतदारांना दिलेला शब्द पाळणार नसेल तर या पक्षाला पुढील निवडणुकीला सामोरे जाणे अशक्य होईल, त्याच वेळी भाजपच्या उद्देशाबाबत शंका व्यक्त करण्याचे कारण नाही. महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिल्याखेरीज कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा उत्तीर्ण करता येणार नाही. सहा सामान्य प्रश्न विचारले असतील तर चार महत्त्वाचे प्रश्न न सोडविल्यास विद्यार्थी अनुत्तीर्ण होतो, तसेच भाजपबाबत राममंदिर मुद्याचे आहे.