शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा उपाध्यक्ष पद भाजपा विरोधकांना नाही सहकाऱ्यांना देणार; राजनाथ सिंहांवर जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 18:51 IST

अध्यक्षपदावरून एकीकडे एनडीएमध्ये कमालीची शांतता असताना तिकडे विरोधकांनी उपाध्यक्ष पदावरून आकांडतांडव करण्यास सुरुवात केली आहे.

मोदी सरकार एनडीएच्या घटक पक्षांच्या मदतीने चालणार आहे. परंतू, ना मंत्रिमंडळ विस्तारात ना लोकसभा अध्यक्षपदासाठी झुकणार अशी भुमिका भाजपाने घेतली आहे. यामुळे एकाबाजुने भाजपाने युतीधर्म निभावू परंतू डोके झुकवून सरकार चालविणार नाही असा संदेशच आपल्या मित्रपक्षांना दिला आहे. खरा पेच लोकसभा अध्यक्ष पदावरून फसलेला असताना भाजपाने ताठर भुमिका घेत एकवेळ उपाध्यक्ष पद देऊ परंतू अध्यक्षपद देणार नाही असा पवित्रा घेतला आहे. 

मित्रपक्षांना यासाठी मनविण्यासाठी भाजपाने राजनाथ सिंह यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकली आहे. या सहकाऱ्यांसोबत बोलून राजनाथ सिंह यांना लोकसभा अध्यक्षपद भाजपसाठी सोडवून घ्यावे लागणार आहे. 

अध्यक्षपदावरून एकीकडे एनडीएमध्ये कमालीची शांतता असताना तिकडे विरोधकांनी उपाध्यक्ष पदावरून आकांडतांडव करण्यास सुरुवात केली आहे. जर उपाध्यक्ष पद दिले गेले नाही तर अध्यक्ष पदासाठी उमेदवार उभा करणार असल्याचे वक्तव्य विरोधकांकडून करण्यात येत आहे. याची तयारीही सुरु झाली आहे. 

गेल्या पाच वर्षांपासून उपाध्यक्ष पद रिक्त आहे. तसेच सभागृहात विरोधी पक्षनेता नव्हता. तो यावेळी इंडिया आघाडीला मिळणार आहे. उपाध्यक्ष पद रिकामे ठेवू नये म्हणून विरोधी पक्ष दबाव टाकू लागला आहे. उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याचा प्रघात आहे. परंतू, गेल्या सरकारमध्ये त्यांना देण्यात आले नव्हते. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाने सभापतीपदासाठी एनडीएला पाठिंबा देण्याचे उघडपणे मान्य केले आहे. परंतू टीडीपीने आपले पत्ते खोललेले नाहीत. यामुळे भाजप टेंशनमध्ये आहे.

भाजपाच्या इतिहासातच उत्तर...लोकसभेचे अध्यक्षपद भाजपाला का महत्वाचे आहे याचे उत्तर या पक्षाच्या इतिहासात लपलेले आहे. १९९८ मध्ये भाजपाच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार आले होते. परंतू काही महिन्यांतच ते अल्पमतातही आले होते. तेव्हाही टीडीपी एनडीएत होता. वाजपेयी सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात टीडीपीने अध्यक्षपद मागितले होते. परंतू, भाजपाने ते न दिल्याने बाजी पालटली होती. तीन भीती आता भाजपाला आहे तर विरोधकांना आशेचा किरण दाखवत आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rajnath Singhराजनाथ सिंह