शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा देणार एक लाख गायी! भाजपातर्फे आश्वासनांची खैरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 05:37 IST

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवे फंडे वापरले जात आहेत. भारतीय जनता पार्टीने सत्तेत आल्यास दरवर्षी १ लाख गायींचे वाटप करण्यात येईल, असे आश्वासन देण्याचे ठरवले आहे. भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे.

- धनाजी कांबळे

हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवे फंडे वापरले जात आहेत. भारतीय जनता पार्टीने सत्तेत आल्यास दरवर्षी १ लाख गायींचे वाटप करण्यात येईल, असे आश्वासन देण्याचे ठरवले आहे. भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे.शेती, आरोग्य आणि ग्रामीण भागातील अर्थकारण गायीवर अवलंबून असते. भाजपा एक वेब पोर्टल तयार करणार असून, ज्यांना गाय हवी आहे, त्यांनी यावर नोंदणी केल्यास त्यांना गाय दिली जाईल. प्रत्येक जिल्ह्यासाठी साधारण ३ हजार गायी दिल्या जाणार आहेत. तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस)ही २०१७ मध्ये अशी योजना आणली होती.सत्तेवर आल्यास तीन महिन्यांच्या आत १ लाख बेरोजगार युवकांना रोजगार असेही आश्वासन भाजपाने दिले आहे. तसेच तेलंगणा राज्य परिवहन मंडळाच्या तिकीटांवर असलेला सरचार्ज हटवला जाईल, त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होईल. तसेच जुन्या बस आणि रिक्षा बंद केल्या जातील, त्या गाडीमालकांना प्रदूषणमुक्त वाहन देण्याचा प्रयत्न आहे, असेही भाजपाने म्हटले आहे.योगा स्कूल व संस्कृत विद्यापीठ उभारू, असेही भाजपाचे आश्वासन आहे. आयटीमधील कर्मचाºयांना चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न भाजपा करणार आहे. योगा हे आरोग्याशी संबंधित आहे, असेही भाजपाने म्हटले आहे. जाहीरनाम्यात हैदराबादचा इतिहास, रझाकार, निजामाचे शासन आणि तेलंगणा राज्याच्या निर्मितीचा संघर्ष याचाही अकॅडमिक आढावा घेण्याचा भाजपाचा मानस आहे.इंधन करणार स्वस्तजनता महागाईने होरपळत आहे. विशेषत: पेट्रोल-डिझेलच्या किमती शंभरीकडे सरकल्या असल्याने भाजपाविरोधात जनमानस आहे. असंतोष कमी करण्यासाठी तेलंगणामध्ये सत्तेत आल्यास पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करू, त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होतील, असे आश्वासन भाजपा देत आहे. पेट्रोलवरील ३२ आणि डिझेलवरील २७ टक्के व्हॅट हटवला जाईल, असे भाजपाने म्हटले.

टॅग्स :BJPभाजपाTelangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018