शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

निवृत्त अधिकाऱ्यांना भाजप देणार लोकसभेची संधी; अमृतसरमधून संधू, दार्जिलिंगमधून शृंगला निवडणुकीच्या रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 06:09 IST

यापूर्वी दोनवेळा पराभूत झालेली ही जागा जिंकण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी १८व्या लोकसभेत नवीन प्रतिभा आणण्यासाठी शोध घेत आहेत. त्यासाठी किमान ५० टक्के विद्यमान खासदार बदलण्यास ते उत्सुक आहेत. सत्ताधारी पक्षातून मिळत असलेल्या संकेतांनुसार अमेरिकेतील भारताचे माजी राजदूत तरनजित सिंग संधू यांना अमृतसरमधून भाजपचे लोकसभा उमेदवार म्हणून पसंती मिळू शकते.

यापूर्वी दोनवेळा पराभूत झालेली ही जागा जिंकण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. २०१४ मध्ये दिवंगत अरुण जेटली यांनी ही जागा गमावली, तर हरदीपसिंग पुरी २०१९ मध्येही ती जागा जिंकू शकले नाहीत. आता पंतप्रधान मोदींनी वॉशिंग्टनमध्ये चार वर्षे सेवा केल्यानंतर या वर्षी ३१ जानेवारी रोजी पद सोडणाऱ्या संधूंच्या नावावर येऊन पंतप्रधान मोदींचा हा शोध संपला आहे. 

पंजाबमध्ये तळ ठोकूनपंजाबचे सुपुत्र असल्याने ते नियमित जेथे जात होते, त्या अमृतसरला थेट गेले. त्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सुवर्णमंदिरात नमन केले. ते तेजा सिंग समुंद्री हॉलमध्ये गेले, ज्याचे नाव त्यांच्या आजोबांच्या नावावर ठेवण्यात आले आहे, तसेच दुर्गियाना आणि श्रीराम तीर्थ मंदिरातही गेले. ते पंजाबमध्ये अक्षरशः तळ ठोकून आहेत, विविध व्यावसायिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांशी संवाद साधत आहेत.

तामिळनाडूमध्ये सुरू आहे जोरदार तयारीपुरी विद्यमान राज्यसभा खासदार असले तरी त्यांना दिल्लीतून रिंगणात उतरवले जाऊ शकते, त्याचप्रमाणे जयशंकर यांना तामिळनाडूमधून उमेदवारी दिली जाऊ शकते, जिथे ते विस्ताराचा जोरदार प्रयत्न करत आहेत. भाजपला तामिळनाडूत किमान अर्धा डझन जागा जिंकण्याची आशा आहे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या व्यतिरिक्त जयशंकर हे एक चेहरा असू शकतात.

माजी परराष्ट्र सचिवांना उमेदवारीnपश्चिम बंगालमधील दार्जिलिंग लोकसभा मतदारसंघातून आणखी एक माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांना उमेदवारी देण्याचा विचार भाजप नेतृत्व करत आहे. n२०१९ मध्ये भाजपने ही जागा जिंकली होती. सध्या तीथे एस. एस. अहलुवालिया खासदार आहेत. शृंगला हे भूमिपुत्र असल्याने त्यांना तेथे आणले पाहिजे, असे म्हटले जात असल्याचे वृत्त आहे.

...तर चार आयएफएस अधिकारी भाजपचे खासदार असतीलआयएफएसमधून दोन नवे चेहरे निवडून आल्यास भाजपकडे असे चार अधिकारी खासदार असतील. माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर हे आधीच परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहत आहेत तर हरदिपसिंग पुरी महत्त्वाची मंत्रिपदे सांभाळत आहेत.

टॅग्स :BJPभाजपा