नवी दिल्ली : जातीय ध्रुवीकरणासाठी भाजप आणि परिवारातील संघटना बहार निवडणुका पार पडण्यापूवी देशात जातीय दंगली घडवून आणतील, अशी शंका काँग्रेसने व्यक्त केली आहे. ही शंका साधार ठरविण्यासाठी पक्ष प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी काही उदाहरणेही दिली.भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी सुरू केलेले सर्वेक्षण देशात फूट पाडण्याचा कट आहे. रांची, जमशेदपूर आणि गोंडा येथील दंगली म्हणजे विभाजनाचे राजकारण आहे. भाजपचे खासदार आणि मंत्री चिथावणीजनक विधाने करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन बाळगून आहेत. या विघटनवादी घटना का घडत आहे. त्याचा संबंध थेट बिहारच्या निवडणुकीशी आहे. धर्माच्या लोकांमध्ये फूट पडावी असा खेळ भाजपने चालविला आहे, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
ध्रुवीकरणासाठी भाजप दंगली घडवेल- काँग्रेस
By admin | Updated: October 1, 2015 00:15 IST