शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
3
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
4
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
5
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
6
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
7
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
8
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
9
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
10
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
11
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
12
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
13
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
14
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
15
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
16
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
17
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
18
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
19
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
20
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...

भाजप ४५० जागांवर गुढीपाडव्यापासून निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 06:56 IST

निवडणुकीचा शंखनाद; पंतप्रधान मोदींसह ५० स्टार प्रचारक 

- संजय शर्मा 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारतीय जनता पक्षाचे ५०हून अधिक स्टार प्रचारक देशातील ४५०हून अधिक मतदारसंघात प्रचार करणार आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे ९ एप्रिल रोजी प्रचार सुरू होणार आहे. 

लोकसभेच्या ३७० जागा जिंकण्यासाठी भाजप देशातील ४५० लोकसभा मतदारसंघात आपले ५० स्टार प्रचारक उतरविणार आहे. भाजपचे स्टार प्रचारक म्हणून पंतप्रधान मोदी यांची मागणी सर्वात जास्त आहे. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना ‘अ’ श्रेणीत ठेवण्यात आले आहे.

मतदान होणार असलेल्या जवळपास प्रत्येक जागेवर पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांच्यापैकी कोणत्याही एका नेत्याची निवडणूक सभा होईलच. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, स्मृती इराणी यांना ‘बी’ श्रेणीत ठेवण्यात आले आहे. त्यांच्या निवडणूक सभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात होणार आहेत. 

भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, मनोज तिवारी, रविकिशन, कंगना रनौत, अरुण गोविल, हेमा मालिनी, निरहुआ यांच्यासह दोन डझनहून अधिक नेत्यांना ‘सी’ श्रेणीत ठेवण्यात आले आहे. 

५० हून अधिक हेलिकॉप्टरसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने संपूर्ण लोकसभा निवडणुकीसाठी ५० हून अधिक हेलिकॉप्टर बुक केले आहेत आणि सुमारे २० हेलिकॉप्टर ऐनवेळीसाठी राखीव ठेवले आहेत.

टॅग्स :BJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४