शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात : जिल्हा परिषद निवडणुकांत काँग्रेसचा 'सुपडा साफ', सर्वच्या सर्व 31 जागांवर भजपचा विजय

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: March 2, 2021 21:44 IST

भाजपला 31 जिल्ह्यांत आपला झेंडा फडकविण्याची संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर या निवडणुकीत काँग्रेसची स्थिती अत्यंत खराब झाली. आपल्या बालेकिल्ल्यातही काँग्रेसचा सफाया. नव्हे, अनेक ठिकाणी काँग्रसला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. (Gujarat district panchayat election)

ठळक मुद्देया निवडणुकीत भाजपने सर्वच्या सर्व 31 जागांवर दणदणीत विजय मिळवत काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. 29 जिल्हा परिषदा तर अशा होत्या, जेथे काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची संख्या दुहेरी आकडाही गाठू शकली नाही.भाजपला 31 जिल्ह्यांत आपला झेंडा फडकविण्याची संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अहमदाबाद - गुजरातमध्येजिल्हा परिषदांसाठी (District Panchayat) झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीचे निकाल येताच भाजपच्या (BJP) गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या निवडणुकीत भाजपने सर्वच्या सर्व 31 जागांवर दणदणीत विजय मिळवत काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. यांपैकी 29 जिल्हा परिषदा तर अशा होत्या, जेथे काँग्रेसच्या (Congress) विजयी उमेदवारांची संख्या दुहेरी आकडाही गाठू शकली नाही. (BJP victory in Gujarat district panchayat election)

गोध्र्यात ओवेसींचं नाणं खण-खणलं; 8 जागांवर लढली निवडणूक, 7 जागा जिंकल्या!

31 जिल्ह्यांत भाजपचा झेंडा -भाजपला 31 जिल्ह्यांत आपला झेंडा फडकविण्याची संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर या निवडणुकीत काँग्रेसची स्थिती अत्यंत खराब झाली. पंचमहाल येथे तर काँग्रेसला आपले खातेही उघडता आले नाही. तर तापी जिल्ह्या परिषदेवर भाजपने पहिल्यांदाच विजय मिळवला आहे. 2015 मध्ये 31 जिल्हा परिषदांपैकी काँग्रेसने 22 जिल्हा परिषदांमध्ये विजय मिळवला होता. तर भाजपला केवळ 7 ठिकानीच विजय मिळाला होता.

आपल्या बालेकिल्ल्यातही काँग्रेसचा सफाया -  ही जिल्हा परिषद निवडणूक काँग्रेससाठी अत्यंत खराब ठरली. विशेष म्हणजे बालेकिल्ले म्हणवल्या जाणाऱ्या जिल्ह्यांतही काँग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागले. महत्वाचे म्हणजे विधानसभेतील विरोधीपक्ष नेते परेश धनानी यांना स्वतःच्या मतदार संघातही काँग्रेसला विजयी करता आले नाही. येथेही काँग्रेसचा मोठा पराभव झाला. एवढेच नाही तर आपला दबदबा असलेल्या साबरकांठा आणि जामनगर जिल्ह्या परिषदेतही काँग्रेसला पराभवाचे तोंड पाहण्याची वेळ आली.

नगरपालिका अन् पंचायत समितीच्या निकालानंतर पंतप्रधान मोदीचं 'क्लिअर' ट्विट

दुहेरी आकडाही गाठता आला नाही - गुजरात जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेतेही आपल्या उमेदवारांना विजयी करू शकले नाही. अमित चावडा, भरत सिंह सोलंकी, अश्विन कोटवाल, विक्रम माडम यांसारख्या नेत्यांच्या भागांतही भाजपने जबरदस्त विजय मिळवला. विशेष म्हणजे येथे काँग्रेसला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. असे मानले जाते की गुजरातच्या शहरी भागांत भाजपचा, तर ग्रामीण भागांत काँग्रेसचा दबदबा आहे. मात्र, यावेळी भाजपने ग्रामीण भागातही काँग्रेसचा पार साफया केल्याचे दिसत आहे.

टॅग्स :GujaratगुजरातZP Electionजिल्हा परिषदBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक