शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 21:54 IST

20 नोव्हेंबरला महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये मतदान संपताच, 22 नोव्हेंबरला दिल्लीतील भाजप मुख्यालयात मोठी बैठक बोलावण्यात आली आहे.

BJP National President : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुका संपताच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार आहे. या संदर्भात भाजपने येत्या 22 नोव्हेंबरला महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत भाजपच्या सर्व राष्ट्रीय पदाधिकारी आणि सर्व प्रदेशाध्यक्षांसह संघटनेशी संबंधित सुमारे 125 प्रमुख नेत्यांची संघटनेच्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात कार्यशाळा होणार आहे. ही बैठक भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी बोलावली असून, त्यात गृहमंत्री अमित शाहदेखील उपस्थित राहतील.

राष्ट्रीय निवडणूक अधिकारी के लक्ष्मण आणि संघटनेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियुक्त केलेले तीन सह-निवडणूक अधिकारी यांच्या व्यतिरिक्त सर्व राज्यांमध्ये नियुक्त केलेले राज्य निवडणूक अधिकारी आणि सह-अधिकारी यांनी बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक आहे. या बैठकीत देशभरातील सक्रिय सदस्य प्रमुखांनाही पाचारण करण्यात आले आहे. या बैठकीत बोलावण्यात आलेल्या भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि भेट देणाऱ्या नेत्यांना स्थानिक सक्रिय सदस्यत्व मोहिमेपासून सुरुवात करून आतापर्यंत झालेल्या सर्व संघटनात्मक निवडणुकीसंबंधीच्या कामांची तपशीलवार माहिती आणण्यास सांगण्यात आले आहे.

निवडणुकीसाठी राष्ट्रीय अपील समितीची स्थापनायाशिवाय राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाजप संघटनेचे केंद्रीय निवडणूक अधिकारी के लक्ष्मण यांनी राष्ट्रीय अपील समितीची स्थापना केली आहे. राधामोहन सिंग यांना या समितीचे निमंत्रक बनवण्यात आले आहे, तर भाजपचे तीन ज्येष्ठ नेते विजयपाल सिंग तोमर, संजय भाटिया, गजेंद्र पटेल यांना राष्ट्रीय अपील समितीचे सहसंयोजक बनवण्यात आले आहे. भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गैरप्रकार होऊ नयेत यासाठी ही अपील समिती काम करते.

शाहांनी कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत प्रगती अहवाल घेतला गेल्या मंगळवारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शाहा यांनी भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा वेग वाढवण्यासाठी कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला भाजपचे संघटन मंत्री बी.एल.संतोषही उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीत गृहमंत्री अमित शाहा यांनी राज्यवार संघटनात्मक निवडणुकांचा प्रगती अहवाल घेतला. त्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया गतिमान करण्याची योजना आखण्यात आली.

15 जानेवारीपर्यंत मिळणार नवीन अध्यक्ष22 नोव्हेंबर रोजी कार्यशाळा आयोजित करून पक्षाध्यक्ष निवडीची प्रक्रिया गतिमान करण्याचा आणि राष्ट्रीय अपील समिती स्थापन करून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपच्या नवीन अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल, असे मानले जात आहे. म्हणजेच 15 जानेवारीनंतर पक्षाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकतो.

 

टॅग्स :BJPभाजपाJ P Naddaजगत प्रकाश नड्डाAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदी