भाजपाला तिसरा हादरा

By Admin | Updated: September 17, 2014 01:48 IST2014-09-17T01:48:27+5:302014-09-17T01:48:27+5:30

नऊ राज्यांतील पोटनिवडणुकीच्या आजच्या निकालाने केंद्रातील सत्तारूढ भाजपाला जोरदार हादरा बसला आह़े

BJP third scourge | भाजपाला तिसरा हादरा

भाजपाला तिसरा हादरा

 हरीश गुप्ता - नवी दिल्ली

नऊ राज्यांतील पोटनिवडणुकीच्या आजच्या निकालाने केंद्रातील सत्तारूढ भाजपाला जोरदार हादरा बसला आह़े भाजपाचे कुशल संघटक मानले जाणारे भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याकडून जागा हिसकावून घेणा:यांसाठीही हा एक सुखद धक्का आह़े उण्यापु:या 1क्क् दिवसांच्या मोदी सरकारसाठी हा तिसरा मोठा धक्का आह़े यापूर्वी उत्तराखंडात सर्व तीन जागा भाजपाने गमवल्या होत्या़ त्यानंतर बिहारातील ताज्या पोटनिवडणुकीतही भाजपाला अशीच धूळ चाखावी लागली होती़ 
 या पोटनिवडणुकांपूर्वी 32 विधानसभा जागांपैकी भाजपाकडे 26 जागा होत्या़ मात्र पोटनिवडणुकीत उत्तर प्रदेशातील आठ तर राजस्थानात तीन जागा भाजपाने गमावल्या़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातेत भाजपाला सर्वाधिक लाजिरवाण्या स्थितीला सामोरे जावे लागल़े विशेष म्हणजे, पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मोदी प्रथमच गुजरात दौ:यावर येत असताना, भाजपाला या स्थितीचा सामना करावा लागला़ येथे भाजपाकडून तीन जागा हिसकावून घेण्यात काँग्रेस यशस्वी ठरली़ 
चीनचे राष्ट्राध्यक्ष  बुधवारी गुजरातेतून आपल्या भारत दौ:याचा शुभारंभ करीत आहेत़ चीनी राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ मोदींनी एका भव्य मेजवानीचे आयोजन केले आह़े त्यासाठी मोदी गुजरातेत दाखल झाले आहेत़ पोटनिवडणुकीच्या निकालांवर संध्याकाळर्पयत भाजपा नेतृत्वाकडून अधिकृत प्रतिक्रिया आली नव्हती. मोदींनी  गुजरातेत पक्ष कार्यकत्र्याना संबोधित केल़े मात्र मंगळवारच्या पोटनिवडणुकीच्या निकालांवर बोलणो त्यांनी टाळल़े अमित शहा हेही त्यांच्यासोबत होत़े मात्र त्यांनीही याबाबत चकार शब्द काढला नाही़ तथापि सूत्रंच्या मते, त्यांच्यात या मुद्यावर चर्चा झाली़ केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पोटनिवडणुकीच्या प्रचार मोहिमेत भाग घेतला 
होता़ मात्र त्यांनीही आजच्या मतमोजणीनंतरच्या निकालावर प्रतिक्रिया दिली नाही़ नाही म्हणायला, पक्ष नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी संध्याकाळी टि¦ट केल़े पोटनिवडणुकीचे निकाल हा एक धडा आह़े स्थानिक स्तरावरील अडचणी दूर करण्याचा संदेश यातून मिळाला आहे, असे ते म्हणतात़
 काही महिन्यांपूर्वी भाजपा आणि मोदींबद्दल मौन बाळगणा:या सोशल मीडियाने आता सत्तारूढ पक्षातील ‘लव्ह जिहादी’बाबत आगपाखड सुरू केली आह़े एवढेच नव्हे तर दिलेली आश्वासने पाळण्याची वेळ आली असल्याचे सांगून भाजपाला सतर्कही केले आह़े निश्चितपणो, जातीय आधारावर फुटीचे राजकारण करण्याच्या भाजपाच्या डावपेचाचा विपरीत परिणाम या पोटनिवडणुकीतून दिसून आला आह़े पक्षाने मतदारांना गृहीत धरता कामा नये, हे या निकालातून सिद्ध झाले आह़े असे नसते तर मे महिन्यातील लोकसभा निवडणुकीदरम्यान उत्तरप्रदेशात 8क् पैकी 73 जागा जिंकणा:या भाजपाने या पोटनिवडणुकीत 11 पैकी सात विधानसभा जागा गमावल्या नसत्या़
गुजरातेतही भाजपाने काँग्रेसला जागा निर्माण करून दिली आह़े हे 1क् जनपथवर आनंद निर्माण करणारे आह़े गांधी कुटुंबाला खेळात सहभागी होण्यासाठी अशाच संधीची वाट होती़ पक्षातील त्यांच्या टीकाकारांची तोंडे त्यामुळे बंद झाली आहेत़ भाजपाच्या बाजूने वळलेले दिसलेले काँग्रेसमधील असंतुष्ट या निकालानंतर तरी सक्रिय होतील का, हे पाहणो यामुळे औत्सुक्याचे होणार आह़े
 
प. बंगालमध्ये दिलासा
पोटनिवडणुकीच्या निकालात केवळ पश्चिम बंगालात भाजपाला काहीसा दिलासा मिळाला आह़े 15 वर्षानंतर भाजपाने बशीरहाट दक्षिण ही विधानसभा जागा जिंकून या राज्यात आपले खाते उघडले आह़े सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने चौरंगी या जागेवरील आपला ताबा कायम ठेवला आह़े
 
पोटनिवडणुकीच्या निकालाने काँग्रेस उत्साहात
नवी दिल्ली : नऊ राज्यांतील पोटनिवडणुकीचे निकाल पाहून काँग्रेस सुखावली आह़े यानिमित्ताने भाजपावर ताशेरे ओढताना, पोटनिवडणुकीचे हे निकाल भाजपासाठी धोक्याची घंटा असल्याचे काँग्रेसने म्हटले आह़े जनतेने भाजपाच्या ध्रुवीकरणाचे धोरण अमान्य ठरवले आहे, अशी प्रतिक्रियाही काँग्रेसने दिली आह़े दुसरीकडे भाजपाने निकाल अपेक्षेप्रमाणो नसल्याची कबुली देत लोकांनी स्थानिक मुद्दय़ांवर मतदान केल्याने हे चित्र दिसत असल्याचे म्हटले आह़े
 
लोकांना भाजपा आणि मोदी सरकारची ध्येयधोरणो आवडलेली नाही़ पंतप्रधान मोदी स्वत: शांत राहून भाजपा नेते व मंत्र्यांद्वारे धुव्रीकरणाचे राजकारण करीत आहेत़ त्याचा हा परिपाक आह़े गुजरातेत आणि राजस्थानात काँग्रेसचा विजय महत्त्वपूर्ण आह़े
- शकील अहमद, 
कॉंग्रेस सरचिटणीस
 
काही ठिकाणी आम्ही विजयी झालो काही ठिकाणी पराभूत़ निकाल आमच्या अपेक्षेनुरूप नाहीत़ पण या पोटनिवडणुका स्थानिक मुद्दय़ांवर लढल्या गेल्या, हे विसरता येणार नाही़ पश्चिम बंगालमध्ये कमळ उमलले ही आमच्यासाठी समाधानाची बाब आह़े
- शाहनवाज हुसेन, भाजपा प्रवक्ता
 
युवकांनी मोठय़ा प्रमाणात मतदान केल्यामुळे काँग्रेसने राजस्थानातील पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला आह़े भाजपाने सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग केला पण तरीही या पक्षाला तीन जागा राखता आलेल्या नाहीत़
- सचिन पायलट, राजस्थान प्रदेश काँग्रेस अध्यक्ष
 
धर्माच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडण्याचे भाजपाचे प्रयत्न जनतेने हाणून पाडले आहेत़ या निकालांनी सांप्रदायिक राजकारणाला मिळालेली चपराक आह़े
- डी़ राजा, भाकपा नेते
 
राजस्थानातील काँग्रेसचा उल्लेखनीय विजय हा मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची नकारात्मक कार्यशैली आणि मोदी लाट ओसरल्याचा पुरावा आह़े
-अशोक गेहलोत, राजस्थानचे 
माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते
 
जनतेने धर्म आणि जातीपातीच्या आधारावर लढणा:यांना या पोटनिवडणुकीत नाकारल़े निवडणुकीत अखेर विकासाचाच मुद्दा चालतो़ सपाने याच मुद्दय़ावर निवडणुका लढवल्या़
- अखिलेश यादव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री
 
अमित शहांसाठी अडचणी वाढल्या
येत्या महिन्यात महाराष्ट्र आणि हरियाणात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत, या पाश्र्वभूमीवर पोटनिवडणुकांचे आजचे निकाल भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या अडचणी निश्चितपणो वाढविणारे आहेत़ 

Web Title: BJP third scourge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.