शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"मोहब्बत दिल में रहती है, दुकान में नहीं", भाजपचा व्हिडिओद्वारे राहुल गांधींवर निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 16:09 IST

दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी आपल्या भाषणात अनेकवेळा मोहब्बत की दुकानचा उल्लेख केला होता.

नवी दिल्ली : भाजपने शुक्रवारी एक व्हिडिओ जारी करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. भाजपने 'मोहब्बत दिल में रहती है, दुकान में नहीं' अशा ओळींचा उल्लेख करत हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. काँग्रेसच्या परिवारवादाचे धोरण, त्यांनी केलेला भ्रष्टाचार आणि देशाच्या फाळणीसारख्या अनेक कामांची खिल्ली उडवत भाजपने हा व्हिडिओ जारी केला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी आपल्या भाषणात अनेकवेळा मोहब्बत की दुकानचा उल्लेख केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने जारी केलेल्या या व्हिडिओकडे पाहिले जात आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संसदेतील भाषणाचा काही भागही जोडण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदींचे भाषण दाखवण्यात आले असून त्यात ते काँग्रेसवर निशाणा साधताना दिसत आहेत. नरेंद्र मोदी म्हणाले, "हे लुटण्याचे दुकान आहे, यामध्ये द्वेष आहे, घोटाळे आहेत आणि मन काळे आहे". दरम्यान, सध्याचे सरकार देशात केवळ द्वेष पसरवत आहे, असा हल्ला राहुल गांधी पंतप्रधानांवर करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने हा व्हिडिओ जारी केला आहे.

व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना भाजपने लिहिले की, ''मोहब्बत दिल में रहती है, दुकान में नहीं. ये तो कमाई जाती है, कहीं बिकती नहीं. ये तो दिल में रहती है, दुकान में नहीं." याशिवाय, त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सरकारच्या अनेक योजना सुद्धा सांगितल्या. कलम 370 हटवणे, प्रत्येक घरात सिलिंडर पोहोचवणे, आत्मनिर्भर भारत आणि चांद्रयान मिशन यासारख्या योजना या व्हिडिओद्वारे दाखविण्यात आल्या आहेत.

विरोधकांच्या आघाडीवर मोदींचा हल्लाबोलदरम्यान, गुरुवारी संसदेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी आघाडी 'इंडिया'वर हल्लाबोल केला. इंडिया ही आघाडी नसून घमंडिया आघाडी आहे. या आघाडीमध्ये प्रत्येकाला पंतप्रधान व्हायचे आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, राहुल गांधींच्यावर निशाणा साधताना नरेंद्र मोदी म्हणाले की, "त्यांचे मोदींवर इतके प्रेम आहे की, झोपेतही मोदी स्वप्नात येतात". दरम्यान, केंद्र सरकारच्या विरोधात संसदेत आणलेला अविश्वास ठराव फेटाळण्यात आला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा