शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बंगालमध्ये बाईकस्वारांनी धारदार शस्त्रानं भाजपा कार्यकर्त्याची केली निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 09:55 IST

2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसेचे प्रकार समोर आले होते.

कोलकाताः 2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसेचे प्रकार समोर आले होते. अनेक ठिकाणी तृणमूल काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर आता उत्तर 24 परगाणा जिल्ह्यातील बदुरिया भागात अज्ञात लोकांनी भाजपा कार्यकर्त्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. ही घटना बाजितपूर-कालिटोला भागात घडली आहे. मृताची ओळख 35 वर्षीय अजय मंडलच्या रूपात झाली आहे. जो मासे विक्रेता आहे.पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा खून करण्यात आला आहे. तो मासे खरेदी करण्यासाठी एका मासे पालन केंद्रात जात असतानाच त्याची भररस्त्यात हत्या करण्यात आली. अजयला कालिटोला भागात दोन बाइकस्वारांनी थांबवलं. त्यानंतर त्याच्यावर त्या लोकांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या नराधमांनी अजयच्या चेहऱ्यावर वार करून तो पूर्णतः विद्रूप केला. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. त्याच्या घरातील मंडळी आणि तो लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रचारात सक्रिय असल्यानंच त्याची हत्या करण्यात आल्याची आता चर्चा आहे.त्याची हत्या म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. बदुरियाच्या पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, भाजपा समर्थकाशिवाय मृताची त्या भागात एवढी ओळख नाही. त्यामुळे त्याची हत्या करण्याचं कारण राजकीय असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.    

टॅग्स :BJPभाजपा