शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'सेतुसमुद्रम' प्रकल्पाला भाजपचा जोरदार विरोध; म्हणाले- 'कुठल्याही परिस्थितीत रामसेतू तोडू देणार नाही...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 14:43 IST

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी गुरुवारी विधानसभेत 'सेतुसमुद्रम' प्रकल्पावर ठराव मंजूर केला आहे.

भारत आणि श्रीलंकादरम्यान पसरलेल्या सेतुसमुद्रम जलमार्ग प्रकल्पाला भाजपने उघडपणे विरोध केला आहे. या योजनेचा फायदा द्रमुक नेत्यांच्या शिपिंग कंपन्यांनाच होणार असल्याचा आरोप तामिळनाडू भाजप अध्यक्ष अन्नामलाई यांनी केला आहे. भाजप नेत्यानं मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना लक्ष्य करत सेतुसमुद्रम प्रकल्पाला विरोध करत अनेक ट्विट केले आहेत. याशिवाय काही साधूंनीही जलमार्ग प्रकल्पावर चिंता व्यक्त करत रामसेतूला हानी पोहोचणार असल्याचं म्हटलं आहे.

रामसेतू तोडू देणार नाही : भाजप नेतेअन्नामलाई यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी सेतुसमुद्रम प्रकल्पाबाबत विधानसभेची दिशाभूल केली आहे. या प्रकल्पासाठी आम्ही रामसेतू तोडू देणार नाही. या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थापन केलेल्या टीमनं अद्याप राम सेतूवर रिपोर्ट दिली नाही. स्टॅलिन यांनी त्सुनामी तज्ञ प्राध्यापक एस मूर्ती यांच्या सल्ल्याकडेही दुर्लक्ष केलं आहे. रामसेतू तोडल्यास त्सुनामी येऊ शकते, असं ताड यांच मत आहे. सेतुसमुद्रम प्रकल्पाचा फायदा फक्त डीएमके नेते टीआर बाळू आणि कनिमोझी यांच्या मालकीच्या शिपिंग कंपन्यांना होऊ शकतो, असंही म्हटलं आहे.

स्टॅलिन यांनी विधानसभेत ठराव मंजूर केलाCM स्टॅलिन यांनी गुरुवारी विधानसभेत सेतुसमुद्रम प्रकल्पावर ठराव मंजूर केला होता. सेतुसमुद्रम प्रकल्पामुळे 50,000 लोकांना रोजगार मिळेल, असे द्रमुक अध्यक्ष म्हणाले. माजी मुख्यमंत्री कलैगनर करुणानिधी यांनीही असंच म्हटलं होतं, असंही स्टॅलिन म्हणाले. याशिवाय, सेतुसमुद्रम हा अन्ना आणि कलिंगर यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. भाजप सरकारच्या काळात सेतुसमुद्रम प्रकल्प जलमार्ग झाला. अटलबिहारी वाजपेयी यांनीच पंतप्रधान असताना यासाठी निधीची तरतूद केली होती. भाजपनं सेतुसमुद्रम प्रकल्पाला केवळ राजकीय कारणांमुळे विरोध केला. तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता सेतुसमुद्रम प्रकल्पाच्या बाजूने होत्या, पण अचानक त्यांनीही आपली भूमिका बदलली आणि त्याविरोधात गुन्हा दाखल केला, असं स्टॅलिन म्हणाले.

स्टॅलिनच्या प्रस्तावाला साधूंचा विरोधविधानसभेच्या ठरावावर प्रतिक्रिया देताना हिंदू संतांनी हा प्रकल्प 'सनातन धर्मा'च्या विरोधात असल्याचं सांगितलं आहे. सरकारनं रामसेतूचं नुकसान करण्याचा प्रयत्न केल्यास छातीत गोळ्या झाडू, असा इशारा संत दिवाकर आचार्य यांनी शुक्रवारी दिला. रामसेतूला हानी पोहोचवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना संतांकडून जोरदार प्रतिकार केला जाईल, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूBJPभाजपाSri Lankaश्रीलंका