शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पाच राज्यांचे भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार; मंत्रिमंडळ विस्ताराबरोबर संघटनेतही बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 09:35 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत मोदींनी सांगितले की, बदल ही निरंतर प्रक्रिया आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी भावी काळातील बदलांसाठी सज्ज राहावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारच्या योजना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्यात अपयशी ठरणाऱ्यांचे मंत्रिपद काढून घेण्यात येईल, असा इशाराही मोदी यांनी दिला. तसेच राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम या पाच राज्यांचे भाजप प्रदेशाध्यक्षही बदलले जाण्याची शक्यता आहे. 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत मोदींनी सांगितले की, बदल ही निरंतर प्रक्रिया आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी त्याला सामोरे जाण्यास तयार राहिले पाहिजे. पंतप्रधान, गृहमंत्री शाह यांची नुकतीच बैठक झाली होती. त्यानंतर जुलैत मंत्रिमंडळ विस्तार होणार, अशा चर्चेने जोर धरला आहे. 

प्रसारमाध्यमे प्रवक्तेपदीही निवडीभाजप काही नेत्यांची प्रसारमाध्यमे प्रवक्ता म्हणून निवड करणार आहे. त्यामध्ये  गौरव भाटिया (मध्य प्रदेशसाठी), के. के. शर्मा (छत्तीसगढ), राजस्थान (राज्यवर्धनसिंह राठोड), जीव्हीएल नरसिंहा (तेलंगणा) यांचा समावेश असणार आहे. 

कोणत्या राज्यात प्रदेशाध्यक्ष बदल? पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबरोबरच भाजपमध्येही संघटनात्मक बदल करण्याबाबत आग्रही आहेत. त्याची सुरुवात पाच राज्यांतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलण्यापासून होण्याची शक्यता आहे. सर्वात आधी पंजाबमध्ये भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड करण्यात येईल. अश्विनी शर्मा यांनी राजीनामा दिल्याने त्या पदावर सुनील जाखड यांची निवड होईल, अशी चर्चा आहे. तेलंगणा, झारखंड, केरळमध्येही भाजप नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड करण्याच्या विचारात आहे.

निवडणूक प्रभारींची निवडही लवकरच होणारयेत्या नोव्हेंबरमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम या पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता तिथे भाजप केंद्रीय मंत्र्यांना निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी देण्याची शक्यता आहे. त्यात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव यांचा समावेश आहे. 

टॅग्स :BJPभाजपा