शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमधील पराभवामुळे राज्यातील भाजप बॅकफूटवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 05:42 IST

‘ऑपरेशन लोटस’च्या प्रयत्नांना बसला मोठा धक्का

यदु जोशी

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये विजय मिळाल्यानंतर भाजप महाराष्ट्रात ''ऑपरेशन लोटस'' करून सत्ता आणेल असा तर्क दिला जात होता. मात्र तिकडे कमळ कोमेल्याने महाराष्ट्रातील ऑपरेशनलाही मोठा धक्का बसला आहे. असे असले तरी पंढरपूरच्या विजयाने भाजपला बळ दिले आहे.‘पंतप्रधान मोदी आणि विशेषत: फोडाफोडीचे राजकारण करून सत्तासमीकरणे बदलण्याची ताकद राखणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या पश्चिम बंगालच्या राजकारणात व्यग्र आहेत. बंगालचा गड एकदा सर केला की ते महाराष्ट्रात लक्ष घालतील’ असे भाजपचे राज्यातील नेते खासगीत सांगत होते.  ‘सगळी तयारी झाली; फक्त मुहूर्ताची वाट पाहणे सुरू आहे, २ मे नंतर मुहूर्त निघेल’ , असा दावादेखील केला जात होता पण बंगालमध्ये सत्तास्वप्न धुळीस मिळाल्याने आता लगेच महाराष्ट्रात सत्तेसाठीचे ऑपरेशन करण्याची भाजपच्या श्रेष्ठींची मानसिकता नसेल असे मानले जात आहे.

भाजपचा वारू काही प्रादेशिक पक्षांनी रोखून धरला. ओडिशात नवीन पटनाईक यांनी तर बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी भाजपला रोखून धरले आहे. महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेत चमत्कार केला. राजकीय जाणकारांच्या मते बंगालमध्ये भाजपचा विजय झाला असता तर देशाच्या इतर राज्यांमधील प्रादेशिक पक्षांना फोडाफोडीच्या राजकारणाद्वारे कमकुवत करण्याची खेळी भाजपकडून नक्कीच खेळली गेली असती. त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीवर गळ टाकण्याची योजना होती. 

पवार, पाटील यांना धक्कामहाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्ष एकत्र आणि सोबत सहानुभूतीचा फॅक्टर असे अनुकूल चित्र असतानाही भालके यांचा पराभव झाला. प्रचाराची धुरा सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

शिवसेना, राष्ट्रवादीला उभारी  n या विजयात राष्ट्रवादी वा शिवसेनेचा कोणताही वाटा नसला तरी याने राष्ट्रवादी, शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षांना नक्कीच उभारी मिळणार आहे.राष्ट्रवादीला पंढरपूरच्या पराभवाचे आत्मचिंतन करावे लागेल. n ममता यांच्या मदतीने प्रादेशिक पक्षांची राष्ट्रीय स्तरावर मोट बांधण्याचे प्रयत्न शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून होवू शकतात. मात्र, या पराभवाने महाविकास आघाडीत परस्परांविषयी शंकेचे वातावरण निर्माण होऊ शकते. भाजप त्याचा फायदा कसा घेऊ शकेल, हे पहायचे.

भाजप नेत्यांना आत्मविश्वास

n या पराभवाने राष्ट्रवादीलाच नव्हे तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. विरोधात तीन पक्ष अन् सहानुभूती हे फॅक्टर एकत्र आले तरी आपण जिंकू शकतो, असा आत्मविश्वास या विजयाने भाजपजनांना दिला आहे. n ‘पंढरपूरमध्ये तुम्ही यांचा कार्यक्रम करा, मी राज्यात यांचा करेक्ट कार्यक्रम करतो’ असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रचारसभेत म्हणाले होते. n बंगालमधील भाजपच्या पराभवाने महाविकास आघाडी सरकारचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी नवा मुहूर्त शोधण्याची वेळ भाजपवर येऊ शकते. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा