शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अबब...! लोकसभा निवडणुकीत भाजपाचा खर्च तब्बल 27 हजार कोटींवर; सीएमएसचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 09:12 IST

2014 आणि 2019 च्या खर्चाची तुलना केल्यास 2024 मधील लोकसभा निवडणुकीचा खर्च हा एक अब्जावर जाण्याची शक्यता आहे.

यंदाची लोकसभा निवडणूक आतापर्यंतची सर्वात महागडी ठरली आहे. कारणही तसेच आहे. या निवडणुकीत तब्बल 60 हजार कोटीं खर्च करण्यात आले आहेत. यापैकी जवळपास 45 टक्के म्हणजेच 27 हजार कोटींची रक्कम ही एकट्या भाजपाने खर्च केली आहे. सेंटर फॉर मिडीया स्टडीजने सोमवारी जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 

2014 आणि 2019 च्या खर्चाची तुलना केल्यास 2024 मधील लोकसभा निवडणुकीचा खर्च हा एक अब्जावर जाण्याची शक्यता आहे. बिझनेस स्टँडर्डला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सीएमएसचे अध्यक्ष एन भास्करा राव यांनी ही शक्यता वर्तविली आहे. सर्व भ्रष्टाचाराची जननी ही या निवडणुकीच्या खर्चामध्ये आहे. जर आपण हे मूळ शोधू शकलो नाही, तर भारतातील भ्रष्टाचार संपवू शकणार नाही. खर्चाच्या या वाढत्या प्रमाणाने आम्हाला घाबरवावे आणि एक मजबूत लोकशाही तयार करण्यासाठी सुधारात्मक पावले उचलण्याविषयी उद्युक्त करावे, असे ते म्हणाले. 

1998 मध्ये भाजपाने 20 टक्के पैसा खर्च केला होता. तर काँग्रेसने 2009 मध्ये एकूण खर्चाच्या 40 टक्के पैसा खर्च केला होता. हा खर्च आता 15 ते 20 टक्क्यांनी कमी झाला आहे. 

हा अहवाल दुय्यम स्तरावरील माहितीवर आधारित आहे. यामध्ये प्रत्यक्ष अभ्यास आणि विश्लेषन करण्यात आले आहे. यानुसार एका मतदारासाठी 700 रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच 12 ते 15 हजार कोटी रुपये थेच मतदात्यांना वाटण्यात आले, तर 20 ते 25 हजार कोटी रुपये प्रसिद्धी मिळविण्यासाठी खर्च करण्यात आले आहेत. वाहतुकीसाठी 5 हजार कोटी, औपचारिक खर्च 10 ते 12 कोटी आणि अन्य खर्चासाठी 3 ते 6 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. यापैकी अधिकाधिक पैसा हा उद्योगपतींकडून उभारण्य़ात येत असल्याचेही यामध्ये नमूद केले आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाcongressकाँग्रेस