शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Elections 2023:आधी खर्गेंची पीएम मोदींवर टीका; आता भाजप नेत्याचे सोनिया गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 16:07 IST

Karnataka Elections 2023: कर्नाटकच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी नेत्यांची भाषेची पातळी घसरत चालली आहे.

Karnataka Elections 2023: कर्नाटकच्या निवडणुका (Karnataka Election) जसजशा जवळ येत आहेत, तसतशी नेत्यांची भाषेची पातळी घसरत चालली आहे. मते मिळविण्यासाठी नेते एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. आधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पीएम मोदींबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते आणि आता भाजपचे माजी मंत्री आणि आमदार बसनगौडा पाटील यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

खालच्या पातळवरील टीकाभाजपचे नेते बसनगौडा पाटील (Basangouda Patil) यांनी तर सोनिया गांधींना 'विष कन्या' आणि 'पाकिस्तानी एजंट' म्हटले आहे. याआधी मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हे कर्नाटकातील हावेरी येथे काँग्रेसचा प्रचार करत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह विधान केले होते.

एकमेकांविरोधात तक्रारीकर्नाटकातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये एकमेकांविरोधात तक्रारी करण्याची स्पर्धा लागली आहे. मोदी हे विषारी सापासारखे आहेत, या विधानाविरोधात भाजपने यापूर्वीच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. आता भाजप नेत्याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत काँग्रेसने एफआयआर नोंदवणार असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले बसनगौडा पाटील?कोप्पल येथील जाहीर सभेत पाटील म्हणाले की, संपूर्ण जगाने पंतप्रधान मोदींना स्वीकारले आहे. अमेरिकेने एकेकाळी त्यांना व्हिसा देण्यास नकार दिला होता, पण नंतर रेड कार्पेट पसरवून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. खर्गे यांच्या 'विषारी साप' या विधानावर पलटवार करत आमदार म्हणाले की, आता ते (खर्गे) त्यांची (पीएम मोदी) तुलना सापाशी करत आहेत. तुम्ही (खर्गे) ज्या पक्षात नाचता, त्या पक्षात सोनिया गांधी विषकन्या आहेत का? सोनियांनी चीन आणि पाकिस्तानबरोबर त्यांचे एजंट म्हणून काम केले, असेही ते म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकPoliticsराजकारणSonia Gandhiसोनिया गांधी