शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

दलालीच्या पैशातून लंडनमध्ये 8 फ्लॅट्सची खरेदी; भाजपाचा वाड्रांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 14:14 IST

प्रियंका गांधी सक्रीय राजकारणात येताच भाजपाचा हल्लाबोल

नवी दिल्ली: प्रियंका गांधींनी काँग्रेसच्या महासचिव पदाचा कार्यभार स्वीकारताच भाजपानं त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आज एक पोस्टर लावण्यात आलं होतं. त्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, नवनियुक्त महासचिव प्रियंका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचे फोटो होते. त्यावरुन भाजपानं काँग्रेसला लक्ष्य केलं. काँग्रेसच्या एका पोस्टरवर जामीनावर असलेले दोघे दिसत आहेत, असा टोला भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी लगावला. 'राहुल गांधींनी 5 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून पैसे खाल्ले आहेत. तर रॉबर्ट वाड्रा आज मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीसमोर हजर राहणार आहेत. सध्या जामीनावर असलेले हे दोघे एकाच पोस्टरवर दिसत आहेत,' अशी टीका पात्रांनी केली. रॉबर्ट वाड्रा यांच्या मालकीची एक मोठी प्रॉपर्टी असल्याचं आम्ही काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. मात्र लंडनमध्ये त्यांचे एकूण आठ फ्लॅट आहेत, ही माहिती आज देत आहोत. यूपीए-1 च्या काळात पेट्रोलियम आणि संरक्षण करारांमधून वाड्रा यांना प्रचंड दलाली मिळाली. त्याच पैशांमधून लंडनमध्ये फ्लॅट्स खरेदी करण्यात आले. यातील एका-एका फ्लॅटची किंमत कोटींच्या घरात आहे, असे गंभीर आरोप पात्रांनी केले. सेंटेक इंटरनॅशनल नावाची एक कंपनी वाड्रा यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या संजय भंडारी यांची आहे. पेट्रोलियम व्यवहारातून मिळालेली दलाली याच कंपन्यांच्या खात्यात गेली. त्याच पैशांमधून लंडनमध्ये फ्लॅट्स खरेदी करण्यात आले. याशिवाय 2009 मध्ये झालेल्या एका करारातून मिळाळेला पैसा स्कायलाईट नावाच्या दुबईस्थित कंपनीच्या खात्यात गेला. या कंपनीची मालकी सीपी थंपीकडे आहे. थंपी यांची फेमा अंतर्गत चौकशी सुरू आहे. ही व्यक्ती भंडारी आणि वाड्रांसाठी काम करते, असे गंभीर आरोप पात्रा यांनी केले. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीrobert vadraरॉबर्ट वाड्राBJPभाजपाcongressकाँग्रेस