शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पराभवातून भाजपाने धडा घ्यावा -अनुप्रिया पटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 05:50 IST

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) लहान घटक पक्षांकडे भाजपा दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अपना दल (एस) या पक्षाच्या नेत्या व केंद्रीय आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी केला आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) लहान घटक पक्षांकडे भाजपा दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अपना दल (एस) या पक्षाच्या नेत्या व केंद्रीय आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी केला आहे.मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढमधील विधानसभा निवडणुकांतल्या पराभवापासून भाजपाने धडा घ्यावा, असा इशाराही त्यांनी दिला.बिहारमधील लोकसभा जागावाटपात भाजपा अन्याय करीत असल्याची तक्रार करीत राष्ट्रीय लोक समता पार्टीचे (आरएलएसपी) प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी एनडीएला रामराम केला होता. त्यानंतर ते यूपीएमध्ये सामील झाले होते. आता अपना दल (एस) ही भाजपावर टीका करीत आहे. या पक्षाचे अध्यक्ष आशिष पटेल मंगळवारी म्हणाले होते की, २०१९ साली लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएला विजय मिळून नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये आपल्या घटक पक्षांची भाजपाने नीट काळजी घ्यायला हवी. तसे न केल्यास तीन राज्यांची पुनरावृत्ती उत्तर प्रदेशमध्येही होऊ शकते.अपना दल (एस)ची राजकीय ताकद२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अपना दल (एस)ने लढविलेल्या दोन जागांपैकी मिर्झापूर येथून अनुप्रिया पटेल व प्रतापगढमधून या पक्षाचे आणखी एक उमेदवार हरिवंश सिंह निवडून आले होते. राज्याच्या विधानसभेत या पक्षाचे नऊ आमदार आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपा