भाजपाने आत्मपरिक्षण करावे - शत्रुघ्न सिन्हा यांचा घरचा आहेर
By Admin | Updated: November 8, 2015 12:34 IST2015-11-08T12:22:46+5:302015-11-08T12:34:16+5:30
बिहारमध्ये लोकशाहीचा विजय झाला असून भाजपाने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे असा परखड मत मांडत भाजपा खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे.

भाजपाने आत्मपरिक्षण करावे - शत्रुघ्न सिन्हा यांचा घरचा आहेर
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ११ - बिहारमध्ये लोकशाहीचा विजय झाला असून भाजपाने आता आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे असा परखड मत मांडत भाजपा खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे.
बिहार निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला असून पराभवानंतर भाजपाला विरोधकांप्रमाणेच स्वपक्षीयांकडूनही उपदेशाचे डोस मिळू लागले आहेत. भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा ट्विटरवर म्हणाले, बिहारमध्ये लोकशाही व जनतेचा विजय झाला. मी त्यांना वंदन करतो. बिहारमधील बिहारी व बाहरी लोकांचा प्रश्न कायमचा निकाली निघाला आहे. विजय मिळवणा-या सर्वांचे मी अभिनंदन करतो व आमच्या पक्षातील लोकं आत्मपरिक्षण करतील अशी आशा आहे असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
तर दुसरीकडे पक्षाचे नेते राम माधव यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक निवडणुकीत नवीन शिकायला मिळते, आम्ही योग्य पावलं उचलू, आम्हाला थोडा वेळ द्या अशी असे राम माधव यांनी सांगितले.