दिल्लीत भाजप आमदारावर गोळीबार

By Admin | Updated: September 3, 2014 09:50 IST2014-09-03T09:50:27+5:302014-09-03T09:50:52+5:30

दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे आमदार जितेंद्र सिंह शंटी यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

BJP shot dead in Delhi | दिल्लीत भाजप आमदारावर गोळीबार

दिल्लीत भाजप आमदारावर गोळीबार

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे आमदार जितेंद्र सिंह शंटी यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. दिल्लीच्या विवेक विहार परिसरात आज सकाळी साडेपाचच्या सुमारास शंटी याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, मात्र सुदैवाने शंटी या हल्ल्यातून सुखरूप वाचले.  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अज्ञात व्यक्ती जितेंद्र सिंह यांच्या घरी कागदपत्रे प्रमाणित करण्यासाठी आले होते. शंटी यांनी कागदपत्रे प्रमाणित करुन दिल्यानंतर अज्ञातांनी जितेंद्र सिंह यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी शंटी यांच्यावर गोळ्या झाडल्या व ते फरार झाले. दरम्यान हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला असून त्या आधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत
 

Web Title: BJP shot dead in Delhi