तिरुवनंतपुरम - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केरळ दौऱ्यादरम्यान तिरुवनंतपुरमच्या फूटपाथवर फ्लेक्स उभारल्याबद्दल भाजपची सत्ता असलेल्या या महापालिकेने आपल्याच पक्षाच्या जिल्हा शाखेला १९.७ लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच स्थानिक पक्षाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तिरुवनंतपुरम पालिकेच्या तक्रारीआधारे कॅन्टोन्मेंट पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा भाजप जिल्हा अध्यक्ष करमना जयन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान भाजप जिल्हा समितीने फूटपाथवर फ्लेक्स लावल्याने पालयम जंक्शन ते पुलिमुडू जंक्शनपर्यंत जनतेची गैरसोय झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ आणि २८५ तसेच सार्वजनिक वाहतुकीत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी केरळ पोलिस कायद्याच्या कलम १२० (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केरळ उच्च न्यायालयात सध्या सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे लावण्यात येणाऱ्या फ्लेक्स बोर्डाशी संबंधित खटल्याची सुनावणी सुरू आहे, असे बोर्ड लावण्यास जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत.
Web Summary : Thiruvananthapuram municipality, governed by BJP, fined the party's district branch ₹19.7 lakhs for erecting flex boards during PM Modi's visit. Police filed a case against BJP district president for public nuisance, following High Court directives against illegal flex displays.
Web Summary : तिरुवनंतपुरम नगर निगम, जो भाजपा द्वारा शासित है, ने पीएम मोदी की यात्रा के दौरान फ्लेक्स बोर्ड लगाने पर पार्टी की जिला शाखा पर ₹19.7 लाख का जुर्माना लगाया। अवैध फ्लेक्स प्रदर्शनों के खिलाफ उच्च न्यायालय के निर्देशों के बाद पुलिस ने भाजपा जिला अध्यक्ष के खिलाफ सार्वजनिक उपद्रव का मामला दर्ज किया।