शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

संघ आणि भाजपामुळेच हिंदुत्त्वाचे सर्वाधिक नुकसान झाले- शंकराचार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 11:12 IST

गोमांस निर्यात करण्यामध्ये भाजपाचे नेते अग्रेसर आहेत

लखनऊ: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा यांच्यामुळेच हिंदुत्त्वाचे सर्वाधिक नुकसान झाले, अशी टीका शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी केली. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत मांडले. त्यांनी म्हटले की, सरसंघचालक मोहन भागवत यांना हिंदू धर्माची बिलकूल जाण नाही. भागवत म्हणतात की, हिंदूंमध्ये लग्न हा एक सामंजस्य करार आहे. परंतु तसे नसून लग्न म्हणजे संपूर्ण आयुष्याची सोबत आहे. तसेच भागवत केवळ भारतात जन्माला आलेल्या लोकांनाच हिंदू मानतात. तसे असेल तर इंग्लंड किंवा अमेरिकेतील हिंदू मातापित्याच्या पोटी जन्माला येणाऱ्यांचे काय, असा सवाल शंकराचार्य यांनी विचारला. गोमांस निर्यात करण्यामध्ये भाजपाचे नेते अग्रेसर आहेत, भाजपाचे खायचे दात एक आणि दाखवायचे वेगळे आहेत. काश्मीरमध्ये कलम ३७० संपलं का ? तरुणांना रोजगार मिळाला का? पंतप्रधान मोदींनी दिलेल्या वचनाप्रमाणे प्रत्येकाच्या बॅंक खात्यात १५ लाख रुपये जमा झाले काय? अयोध्येत राम मंदिर झालं का? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार शंकराचार्यांनी केला. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपा सरकार राम मंदिर उभारू शकत नाही, असे म्हटले होते. घटनेनुसार केंद्र सरकार हे निधर्मी आहे. परिणामी हे सरकार राम मंदिर, मशिद किंवा गुरुद्वारा उभारू शकत नाही. केवळ आमच्यासारखे रामभक्तच राम मंदिर बांधण्यास समर्थ आहेत, असे शंकराचार्यांनी सांगितले होते. त्यामुळे आता भाजपा या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :BJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ