बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे १३ महिन्यांचे सरकार वाचविण्यासाठी काँग्रेस-जनता दल (एस)यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. बंडखोरांना मंत्री करता यावे आणि भाजपचा सरकार पाडण्याचा डाव उलटून लावावा, यासाठी दोन्ही पक्षांच्या सर्व आमदारांनी सोमवारी पदाचे राजीनामे दिले. मात्र, दोन अपक्ष मंत्री एच नागेश व आर. शंकर यांनी राजीनाम्याबरोबरच कुमारस्वामी सरकारला दिलेला पाठिंबाही काढून घेतला.
आमदाराकीचा राजीनामा दिलेले सारे जण मुंबईच्या सोफीटेल हॉटेलात मुक्कामास होते. काँग्रेस व जनता दलाच्या सर्वच मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतर ते गोव्याकडे रवाना झाले आहेत. तेथून ते कर्नाटकात परतणार की, सरकार पडेपर्यंत तिथेच थांबणार, हे स्पष्ट झालेले नाही. विधानसभाध्यक्ष रमेश कुमार उद्या, मंगळवारी या आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेणार आहेत. त्यामुळे ते कदाचित उद्या बंगळुरूला जातील, असा अंदाज आहे.दोन्ही पक्षांच्या १३ बंडखोर आमदारांना मंत्री करता यावे, यासाठीच सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे काही बंडखोर राजीनाम्याचा फेरविचार करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, त्यांनी असे करू नये, यासाठीच भाजप नेत्यांनी त्यांना गोव्यात नेण्याचा निर्णय घेतला, असे समजते.
काँग्रेसचे एक मंत्री रहीम मेहमूद खान यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ असे ते म्हणाले होते. पण नंतर सर्वच मंत्र्यांनी राजीनामे दिल्याने परिस्थिती बदलली आहे.आमचा संबंध नाही - भाजपकर्नाटकमध्ये भाजपमुळेच राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला असल्याचा आरोप काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांनी लोकसभेत केला.