पंजाबमध्ये भाजपाला खिंडार, प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

By Admin | Updated: January 17, 2017 10:35 IST2017-01-17T10:30:11+5:302017-01-17T10:35:34+5:30

नवजोतसिंग सिध्दू आणि त्यांच्या पत्नीने भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपाला आणखी एक धक्का बसला आहे.

BJP retains Khandar in Punjab, state president resigns | पंजाबमध्ये भाजपाला खिंडार, प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

पंजाबमध्ये भाजपाला खिंडार, प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 17 - पंजाबमध्ये निवडणूकीची रणधुमाळी चागंलीच रंगली आहे. नवजोतसिंग सिध्दू आणि त्यांच्या पत्नीने भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपाला आणखी एक धक्का बसला आहे. भाजपा खासदार विजय सांपला यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यात असेलेल्या पक्षातील अंतर्गत कलहामुळे सांपला यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. आता भाजपाध्यक्ष अमित शहा यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 
काल भाजपाने निवणुकीतील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये फगवाडामधून सोमप्रकाश यांना उमेदवारी देण्यात आली असून सांपला यांनी सोमप्रकाश यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता. मात्र त्यानंतरही सोमप्रकाश यांना उमेदवारी दिल्याने सांपला नाराज आहेत. त्यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे राजीनामा दिला आहे. 

सिद्धू दररोज आई बदलत असतात, पंजाबच्या उपमुख्यमंत्र्यांची जीभ घसरली 

पंजाबमध्ये कौन बनेगा मुख्यमंत्री?

 

Web Title: BJP retains Khandar in Punjab, state president resigns