शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची २९ उमेदवारांची यादी जाहीर; माजी खासदारांना तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 14:50 IST

आपच्या दोन बंडखोरांनाही उमेदवारी

चंद्रशेखर बर्वे

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मर्लोना आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना पराभूत करण्याची जबाबदारी भाजपने दोन माजी खासदारांच्या खांद्यावर टाकली आहे. आतिशी यांच्या विरोधात रमेश बिधुडी यांना तर केजरीवालांच्या विरोधात प्रवेश वर्मा यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. मात्र, गांधीनगरच्या विद्यमान आमदाराचे तिकीट भाजपने कापले आहे.

भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीतील २९ उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर केली. माजी मुख्यमंत्री आणि आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपने नवी दिल्ली मतदारसंघातून माजी खासदार प्रवेश वर्मा यांना तिकीट दिले आहे. तर, मुख्यमंत्री आतिशी मर्लोना यांच्या विरोधात माजी खासदार रमेश बिधुडी यांना कालकाजी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. गांधीनगरचे विद्यमान आमदार अनिल वाजपेयी यांना तिकीट नाकारले असून आपच्या दोन बंडखोरांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

यात कैलाश गहलोत आणि राजकुमार आनंद यांचा समावेश आहे. काँग्रेसमधून आलेले अरविंदर सिंग लवली यांना पक्षाने गांधीनगरमधून उमेदवारी दिली आहे. राजौरी गार्डन मतदारसंघातून मनजिंदर सिंग सिरसा हे उमेदवार असतील. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या विरोधात भाजपने जंगपुरामधून तरविंदर सिंग मारवाह यांना तिकीट दिले आहे. आम आदमी पक्षाने सर्व ७० तर काँग्रेसने ४७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मुख्यमंत्री आतिशी मर्लोना यांच्याविरोधात काँग्रेसने अल्का लांबा यांना उमेदवारी दिली आहे.

आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांमध्ये लढत

  • नवी दिल्ली मतदारसंघात आता तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात लढत होण्याची चिन्हे आहेत. आप प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. 
  • काँग्रेसने दिवंगत माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे चिरंजीव संदीप दीक्षित यांना तर भाजपने दिवंगत माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे चिरंजीव प्रवेश वर्मा यांना तिकीट दिले आहे.
टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाAAPआपcongressकाँग्रेस