'ममता बॅनर्जींचा वीक पॉइंट भाजपने ओळखलाय, दीदींनी चिडायला नव्हतं पाहिजे'

By महेश गलांडे | Published: January 25, 2021 07:42 AM2021-01-25T07:42:15+5:302021-01-25T07:51:51+5:30

कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्या.

BJP recognizes Mamata Banerjee's week point, Shiv Sena advises by samana sanjay raut | 'ममता बॅनर्जींचा वीक पॉइंट भाजपने ओळखलाय, दीदींनी चिडायला नव्हतं पाहिजे'

'ममता बॅनर्जींचा वीक पॉइंट भाजपने ओळखलाय, दीदींनी चिडायला नव्हतं पाहिजे'

Next
ठळक मुद्देस्वातंत्र्यलढ्या प. बंगाल, पंजाब व महाराष्ट्राचे नेतृत्व पुढे होते. आजही तीनही राज्ये स्वाभिमानासाठी लढत आहेत व केंद्र सरकार या तीनही राज्यांच्या विरोधात उभे ठाकले आहे. पंजाबच्या शेतकऱयांना दिल्लीच्या सीमेवर ठेचले जात आहे.

मुंबई - पश्चिम बंगालमध्ये राजकारण चांगलंच तापलं असून आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी भाजपाकडून जोरदार तयारी सुरु आहे. फोडा आणि राज्य मिळवा, या एकसुत्रीने तृणमूल काँग्रेसचे नेते भाजपात ओढून घेण्यात येत आहेत. त्यामुळे, महाराष्ट्रात जे घडलं, तेच आता पश्चिम बंगालमध्ये घडत असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून केंद्र सरकावर आणि भाजपावर तोफ डागण्यात आलीय. तसेच, जय श्री रामच्या घोषणेवरुन ममता बॅनर्जी यांनी चिडायची गरज नव्हती, याउलट त्यांच्या सुरात सूर मिसळायला हवा होती. कारण, निवडणुका होईपर्यंत भाजपवाले अशा नाजूक विषयांवर मर्मभेद करीत राहतील, असे शिवसेनेनं म्हटलंय.  

कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व्यासपीठावर भाषण करण्यासाठी जात असतानाच या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे नाराज होत ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला. यावरुन तेथील राजकारण आता आणखीनच तापलंय. यावरुन शिवसेनेनं ममता बॅनर्जींना सबुरीचा सल्ला दिलाय. 

पंतप्रधान व्यासपीठावर असताना मुख्यमंत्री ममता बोलायला उभ्या राहिल्या, तेव्हा 'जय श्रीराम'चे नारे गर्दीने दिले. ममता बॅनर्जी यावर चिडल्या व हा आपला अपमान असल्याचे त्यांनी माईकवरूनच सांगितले. ममता बॅनर्जी यांचा 'वीक पॉइंट' बंगाल भाजपने ओळखला आहे व निवडणुका होईपर्यंत ते अशा नाजूक विषयांवर मर्मभेद करीत राहतील. 'जय श्रीराम'च्या नाऱयांवर ममता चिडू नयेत, या मताचे आम्ही आहोत. उलट त्यांच्या सुरात सूर मिसळला असता तर डाव समोरच्यांवरच उलटला असता, पण प्रत्येक जण आपल्या व्होट बँकेचीच पखाली वाहत असतो. प. बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव करायचाच, प. बंगालवर भाजपचा विजयध्वज फडकवायचाच या जिद्दीने भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व बंगालच्या मैदानात उतरले असून स्वतः गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नड्डा व इतर अनेक नेत्यांचा बंगालातील राबता वाढल्याचेही शिवसेनेनं म्हटलंय.  

स्वातंत्र्यलढ्या प. बंगाल, पंजाब व महाराष्ट्राचे नेतृत्व पुढे होते. आजही तीनही राज्ये स्वाभिमानासाठी लढत आहेत व केंद्र सरकार या तीनही राज्यांच्या विरोधात उभे ठाकले आहे. पंजाबच्या शेतकऱयांना दिल्लीच्या सीमेवर ठेचले जात आहे. प. बंगालात धुमशान सुरू आहे. महाराष्ट्रावर ठरवून हल्ले केले जात आहेत. जे महाराष्ट्रात घडले, तेच प. बंगालात घडताना दिसत आहे. स्वतःचे काहीच नाही. ज्यांच्याबरोबर लढायचे त्यांचेच लोक फोडून आपली फौज तयार करायची व जितं मय्याचा गजर करायचा. बिहारलाही तेच झाले. आता प. बंगालातही तृणमूल फोडून तृणमूलवर विजय मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे. चालू द्या!, असे म्हणत भाजपावर टीका करण्यात आलीय. दरम्यान, निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मे महिन्यात बंगाल सरकारचा कार्यकाळ संपत असल्याचे सांगितले. तसेच, येथील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आढावा घेतला. त्यामुळे, लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

ममत बॅनर्जींना पाठवली रामायणाची प्रत

मध्यप्रदेश विधानसभेचे प्रोटेम स्पीकर आमदार रामेश्वर शर्मा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रामायणाची एक प्रत पाठवली आहे. "पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रामायणाची प्रत पाठवली आहे. अपेक्षा आहे की, ममता दीदी रामायणाचे वाचन करतील, प्रभू श्रीरामाचे चरित्र समजतील आणि य़ापुढे जय श्रीरामच्या घोषणांचा विरोध करणार नाहीत" असं त्यांनी म्हटलं आहे. रामेश्वर शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. 
 

Web Title: BJP recognizes Mamata Banerjee's week point, Shiv Sena advises by samana sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.