शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

२०१९-२० मध्ये भाजपला मिळाली सर्वाधिक देणगी; फ्यूचर गेमिंगचा ८०% निधी ‘द्रमुक’ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 05:50 IST

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार ‘भाजप’ने ६ हजार ९८६.५ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे वटवले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: ‘द्रमुक’ला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून एकूण ६५६.५ कोटी रुपये मिळाले असून, त्यात फ्यूचर गेमिंगने दिलेल्या निधीचा वाटा ८० टक्के आहे. ‘फ्यूचर गेमिंग’ने जानेवारी २०२४ पर्यंत एकूण १ हजार ३६८ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केल्याचे स्टेट बँकेने दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे. त्यापैकी ३७ टक्के निधी ‘द्रमुक’च्या वाट्याला गेला आहे.

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार ‘भाजप’ने ६ हजार ९८६.५ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे वटवले. २०१९-२० सालात भाजपला सर्वाधिक २५५५ कोटी रुपयांची देणगी मिळाली. पश्चिम बंगालच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने १ हजार ३९७ कोटी, काँग्रेसने १ हजार ३३४.३५ कोटी, भारत राष्ट्र समितीने १ हजार ३२२ कोटी, शिवसेनेने ६०.४ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे वटवल्याचे समोर आले आहे.

३० टप्प्यांमध्ये योजना

  • रोख्यांची योजना १ मार्च २०१८ पासून एकूण ३० टप्प्यांमध्ये राबविण्यात आली. प्रत्येक टप्प्यात रोखे खरेदीसाठी १० दिवसांची,  वटविण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली. 
  • देणगीदार वर्षातून चार वेळा रोखे खरेदी करू शकत होते. त्यापैकी ९ एप्रिल २०१९ पासून ३० जानेवारी २०२४ पर्यंतच्या २२ टप्प्यांत खरेदी केलेल्या आणि वटवलेल्या निवडणूक रोख्यांची माहिती आयोगाने १४ मार्च २०२४ रोजी जाहीर केली होती.

पुन्हा याचिका

१ मार्च २०१८ ते ११ एप्रिल २०१९ दरम्यान खरेदी केलेले निवडणूक रोखे उघड करण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत म्हटले आहे की, योजना सुरू झाल्यापासून संपूर्ण कालावधीसाठी मतदारांना राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्या जाणून घेण्याचा अधिकार आहे.

टॅग्स :BJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमSBIएसबीआय