शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
3
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
4
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
5
किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
6
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
7
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!
8
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
9
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
10
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
11
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
12
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
13
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
14
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
15
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
16
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
17
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
18
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
19
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
20
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले

भाजपला मिळाली सर्वाधिक देणगी; काँग्रेसला किती मिळाली? कुठल्या क्रमांकावर आम आदमी पार्टी? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 19:41 IST

राष्ट्रीय पक्षांना मिळालेली एकूण घोषित देणगी २५४४.२८ कोटी रुपये आहे, जी १२५४७ देणगीदारांकडून मिळाली.

भारतीय जनता पक्षाला २०२३-२४ या आर्थिक वर्षात सर्वाधिक म्हणजेच २२४३ कोटी रुपयांहूनही अधिक देणगी मिळाली आहे. देशातील राष्ट्रीय पक्षांचा विचार करता हा आकडा सर्वाधिक आहे. निवडणुकीशी संबंधित संघटना 'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' (ADR) ने त्यांच्या अहवालात ही माहिती प्रसिद्ध केली आहे. हा अहवाल निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या माहितीवर आधारित आहे. या आकडेवारीत २० हजार रुपयांपेक्षा अधिकच्या राजकीय देणग्यांची माहिती देण्यात आली आहे.

राष्ट्रीय पक्षांना मिळालेली एकूण घोषित देणगी २५४४.२८ कोटी -राष्ट्रीय पक्षांना मिळालेली एकूण घोषित देणगी २५४४.२८ कोटी रुपये आहे, जी १२५४७ देणगीदारांकडून मिळाली. गेल्या वर्षीपेक्षा हा आकडा १९९ टक्क्यांनी अधिक आहे. एकूण घोषित देणग्यांपैकी ८८ टक्के देणगी एकट्या भाजपकडे आहेत. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना १९९४ देणग्यांमधून २८१.४८ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे.भाजप पहिल्या क्रमांकावर -आम आदमी पार्टी (आप), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) आणि नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीईपी) यांनी कमी रकमेची माहिती दिली. तर बहुजन समाज पार्टीने (बसपा) पुन्हा एकदा गेल्या १८ वर्षांच्या त्यांच्या दाखल केलेल्या आकड्यांप्रमाणेच २०,००० रुपयांच्या मर्यादेपेक्षा अधिकच्या देणग्या नसल्याचे जाहीर केले आहे.

काँग्रेसच्या देणगीत गेल्या वर्षाच्या तुलनेत २५२.१८ टक्के वाढ -भाजपला मिळाणारी देणगी आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या ७१९.८५८ कोटी रुपयांवरून वाढून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २,२४३.९४ कोटी रुपये झाली. अर्थात २११.७२ टक्क्यांनी वाढल्याचे दिसते. याचप्रमाणे, काँग्रेसला मिळालेली देणगी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये मिळालेल्या ७९.९२४ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २८१.४८ कोटी रुपयांपर्यंत वाढली, यात २५२.१८ टक्क्यांची वाढ दिसून येते.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसAam Admi partyआम आदमी पार्टीPoliticsराजकारण