शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजपाचे पुन्हा 'जय श्री राम', संकल्पपत्रात राम मंदिराचा उल्लेख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 13:46 IST

गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाही भाजपाने राम मंदिराचा उल्लेख केला आहे. 

नवी दिल्ली: गेल्या 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राम मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले भाजपाने दिले होते. हाच मुद्दा भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत आणला आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी भाजपाने आपला आज जाहीरनामा प्रसिद्ध केला असून या जाहीरनाम्याला ‘संकल्पपत्र’ असे नाव दिले आहे. 

नवी दिल्लीतील भाजपाच्या कार्यालयात सोमवारी 'संकल्पपत्र' प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते.

भाजपाने सन 2022 पर्यंत आपल्या संकल्प पत्रातील 75 संकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये राम मंदिर, शेती, संरक्षण, व्यापार अशा विविध मुद्द्यावर भाजपाने 'संकल्पपत्र' तयार केले आहे. यावेळी राजनाथ सिंह यांनी सांगितले की, सौहार्दपूर्ण वातावरणात लवकरात लवकर राम मंदिर बांधण्यासाठी आपचे प्रयत्न सुरु आहेत.  राम मंदिरासाठी सर्व शक्यता तपासल्या जाणार आहेत. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाही भाजपाने राम मंदिराचा उल्लेख केला आहे. 

भाजपाच्या 'संकल्पपत्रा'तील महत्वाचे मुद्दे ...- 1 लाखापर्यंतच्या कृषी कर्जावर 5 वर्षांपर्यंत कोणतेही व्याज नाही- सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार.- राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार - दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी- छोट्या व्यापाऱ्यांना पेंशन मिळणार- प्रत्येक घरात वीज, शौचालय पोहोचवण्यातं लक्ष्य- सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळाणार- तिहेरी तलाक विरोधात कठोर कायदा आणणार-सिटीजनशिप विधेयक लागू करणार- सर्व शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा फायदा मिळणार- समान नागरी कायदा लागू करणार.- देशातील छोट्या शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करणार- सन २०२२ पर्यंत देशभरातील सर्वच रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण करणार- कलम ३५ अ रद्द करण्यासाठी सरकार कटिबद्ध - 5 किमी अंतरात बँकिंग सुविधा करणार- सरकारी प्रक्रिया, कामकाज संपूर्ण डिजिटल करण्यावर जोर- कलम 35-अ हटवण्यासाठी प्रयत्न करणार- 75 नवी वैद्यकीय महाविद्यालये निर्माण करणार- कुपोषणाचा स्तर घटवणार- आरोग्य सेवा घराच्या दाराशी पोहोचावी अशी व्यवस्था करणार- सर्व घरांत शौचालय असेल यावर काम करणार- सर्वांना घर मिळावे यासाठी संकल्पबद्ध- सर्वांना घरगुती गॅस उपलब्ध करून देणार- राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार- नल सें जल यावर काम करणार- दुष्काळ, पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलशक्ती मंत्रालय बनवणार

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक