शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणूक निकालांनी भाजपा, राजेंना दिला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 01:30 IST

सत्ताधारी पक्षाने पोटनिवडणूक हरणे तसे धक्कादायकच. विशेषत: राज्यात व केंद्रात एकाच पक्षाचे सरकार असताना. विरोधी पक्षांच्या उमेदवाराला निवडून दिल्यामुळे ना सरकारमध्ये काही फरक पडतो ना विरोधी लोकप्रतिनिधीकडून कामे करून घेणे शक्य होते.

नवी दिल्ली  - सत्ताधारी पक्षाने पोटनिवडणूक हरणे तसे धक्कादायकच. विशेषत: राज्यात व केंद्रात एकाच पक्षाचे सरकार असताना. विरोधी पक्षांच्या उमेदवाराला निवडून दिल्यामुळे ना सरकारमध्ये काही फरक पडतो ना विरोधी लोकप्रतिनिधीकडून कामे करून घेणे शक्य होते. तरीही अजमेर व अलवरच्या मतदारांनी लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला निचडून देणे भाजपाला अडचणीचे ठरणार आहे.या राज्यांत काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार असून, भाजपासाठी ही धोक्याची घंटाच मानले जात आहे. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या कारभाराविषयी लोकांत नाराजी आहे की, भाजपावर राग आहे, हे या निवडणुकांतून स्पष्ट झाले नसले तरी, विधानसभा निवडणुका भाजपाला सोप्या जाणार नाहीत, असे मात्र उघड आहे. या पोटनिवडणुकांच्या निकालांचे परिणाम काँग्रेस व भाजपच्या मनोधैर्यावर व सत्ता समीकरणांवर परिणाम करणारे आहेत. स्वत: वसुंधरा राजे यांनी या पोटनिवडणुकांत प्रचार केला होता. काही आठवडे त्यांनी मतदारसंघात घालवले होते. तब्बल २४ मंत्री भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी तिथे मुक्काम ठोकून होते. त्यामुळे ते या पराभवाची जबाबदारी टाळू शकत नाहीत. ज्या फरकाने पराभव झाला त्यावरून सरकारविरोधात जवळपास लाट असल्याचे दिसते. वसुंधरा राजे या लोकप्रिय नसून नेतृत्वात बदल व्हावा, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमधील अनेकांना वाटते. भाजपमध्ये ज्या गटाला राजे यांचे नेतृत्व नको आहे, त्यांना या पराभवाने बळ मिळेल. राजे यांना राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचारसुरू झाल्यावर या पराभवामुळे बचावात्मक पवित्रा घ्यावा लागेल. त्याशिवाय पक्ष कार्यकर्त्यांचे नीतिधैर्यही कमी होईल. (वृत्तसंस्था)काँग्रेसमध्ये पुन्हा सत्तास्पर्धा?हे पराभव मोदी सरकार व भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याबरोबरच वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला चांगलाच झोंबणारे आहेत. या तिन्ही विजय म्हणजे काँग्रेसला व प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांना मोठा उत्साह देणारे आहेत. मात्र या विजयानंतर पायलट व माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यात पक्षांतर्गत सत्तास्पर्धा सुरू होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूकRajasthanराजस्थान