आप जोड/ भाजपवर आरोप पोलिसांवर भाजपचा दबाव- केजरीवाल

By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:29+5:302015-02-06T22:35:29+5:30

दिल्लीचे पोलीस भाजपच्या दबावाखाली आम आदमी पार्टीच्या उमेदवारांवर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या सापडल्याप्रकरणी आपचे उत्तमनगर येथील उमेदवार नरेश बालयान यांना पोलिसांनी पाचारण केल्यानंतर केजरीवाल यांनी भाजपवर हल्ला चढविला.

BJP pressure against the accused / BJP accused police - Kejriwal | आप जोड/ भाजपवर आरोप पोलिसांवर भाजपचा दबाव- केजरीवाल

आप जोड/ भाजपवर आरोप पोलिसांवर भाजपचा दबाव- केजरीवाल

ल्लीचे पोलीस भाजपच्या दबावाखाली आम आदमी पार्टीच्या उमेदवारांवर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या सापडल्याप्रकरणी आपचे उत्तमनगर येथील उमेदवार नरेश बालयान यांना पोलिसांनी पाचारण केल्यानंतर केजरीवाल यांनी भाजपवर हल्ला चढविला.
पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. बालयान यांच्यावरील आरोप खोटे असून त्यामागे भाजपचेच राजकारण आहे, असे ते म्हणाले.
-------------------------
किरण बेदींविरुद्ध निदर्शने
किरण बेदी यांनी शुक्रवारी आपल्या कृष्णानगर मतदारसंघातील खजुरी खास या मुस्लीम वस्तीला भेट दिली असता स्थानिक रहिवाशांनी निदर्शने करीत संताप व्यक्त केला. प्रचाराची मुदत संपली असतानाही बेदी प्रचार करीत असल्याचा आरोप करीत लोकांनी निदर्शने केली. प्रचार संपला असतानाही बेदी येथे कशा काय आल्यात? असा सवाल एका नागरिकाने केला. एका गटाने त्यांची कार अडविल्यानंतर त्यांना माघारी परतणे भाग पडले. बेदी पक्ष कार्यकर्त्यांसोबत बंदद्वार बैठकीसाठी त्या भागात गेल्या होत्या असा खुलासा त्यांच्या समर्थकांनी केला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत गर्दीला पांगविले.
-------------------
बेदींनी लंगरसाठी लाटल्या पोळ्या
बेदींनी शुक्रवारी कृष्णनगर मतदारसंघातील एका गुरुद्वारात प्रार्थना केल्यानंतर स्वयंपाकगृहात जाऊन लंगरसाठी पोळ्याही लाटल्या. त्यावेळी त्यांचे समर्थक उपस्थित होते. शीख मतदारांना प्रभावित करण्याचा हा प्रयत्न मानला जातो.

Web Title: BJP pressure against the accused / BJP accused police - Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.