शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 18:07 IST

भारतीय सैन्याने पाकिस्तानात ३०० किमी घुसून त्यांचे ११ एअरबेस उद्ध्वस्त केले. ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. १५० हून दहशतवादी मारले असं नड्डा यांनी म्हटलं.

भोपाळ - केंद्रीय मंत्री आणि भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुल गांधी यांनी सैन्य आणि देशातील १४० कोटी जनतेचा अपमान केला आहे हे देशद्रोहापेक्षा कमी नाही अशा शब्दात नड्डा यांनी निशाणा साधला. मध्य प्रदेशात भारत-पाकिस्तान सीजफायरवर राहुल गांधी यांनी जे विधान केले त्यावरून नड्डा यांनी पलटवार केला. राहुल गांधी यांच्या विधानावरून सत्ताधारी भाजपा नेते संतापले आहेत. 

जे.पी.नड्डा म्हणाले की, राहुल गांधी यांच्याकडून भारतीय सैन्याच्या शौर्याचे आणि पराक्रमाला सरेंडर शब्द वापरणे हे दुर्दैवी आहे. भारतीय सैन्य आणि देशातील १४० कोटी जनतेचा हा घोर अपमान आहे. जर एखादा पाकिस्तानी असं बोलला असता तर आम्ही त्याच्यावर हसलो असतो परंतु ज्याप्रकारे ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानात खळबळ माजली, त्यानंतर पाकिस्तानी जनतेपासून त्यांचे सैन्य, सरकार आणि त्यांच्या पंतप्रधानांनीही हे बोलण्याची हिंमत केली नाही. परंतु राहुल गांधी जे बोलतायेत ते देशद्रोहापेक्षा कमी नाही असं त्यांनी म्हटलं.

तसेच भारतीय सैन्याने पाकिस्तानात ३०० किमी घुसून त्यांचे ११ एअरबेस उद्ध्वस्त केले. ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. १५० हून दहशतवादी मारले. पाकिस्तान जगाला रडत रडत भारतीय सैन्याने पाकमध्ये १८ ठिकाणी हल्ला केला, त्यात सर्व उद्ध्वस्त झाल्याचे सांगतोय आणि राहुल गांधी देशात सरेंडर केल्याची गोष्ट करतात. ऑपरेशन सिंदूरच्या यशाची घोषणा कुठल्याही भाजपा प्रवक्त्याने केली नाही हे राहुल गांधींना कळायला हवे होते. भारतीय सैन्याने हा पराक्रम जगासमोर सांगितला असंही जे.पी. नड्डा यांनी सांगितले.

दरम्यान, ज्यांचे धोरण कायम सरेंडरचे राहिले आहे त्यांना दुसरे काही सुचणार नाही. राहुल गांधीजी सरेंडर तुम्ही करता, तुमच्या पक्षाने केले आहे. तुमच्या नेत्यांनी केले आहे कारण तुमचा इतिहास तोच आहे. भारत कधीही सरेंडर करत नाही. सरेंडर हा तुमच्या पक्षाच्या डिक्शनरीत आहे. तुमचा डीएनए आहे. काँग्रेस पक्षाच्या सरकारचा इतिहास आठवा त्यात तुम्ही सरेंडर केल्याचे दिसून येईल. तुम्ही दहशतवादासमोरही सरेंडर केले. १९७१ ची लढाई जिंकल्यानंतरही शिमला इथं टेबलवर सरेंडर केले. १९६२ च्या लढाईत सरेंडर केले. देशाच्या स्वातंत्र्यावेळी तुम्ही मुस्लीम लीगसमोरही सरेंडर केले असा घणाघात जे.पी. नड्डा यांनी केला.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

भारत-पाकिस्तान यांच्या सीजफायरवर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भाजपा-आरएसएसची सरेंडरची सवय आहे. जर देशात काँग्रेस सरकार असते तर कधीही सरेंडर केले नसते. ट्रम्प यांचा फोन आला आणि पंतप्रधान मोदींनी तातडीने सरेंडर केले. भाजपा-आरएसएसचा स्वभावच कायम झुकण्याचा आहे. ट्रम्प यांनी मोदींना इशारा केला तर मोदींनी ट्रम्प यांच्या आदेशाचे पालन केले असं त्यांनी म्हटलं.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीJ P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरNarendra Modiनरेंद्र मोदी