शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
4
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
5
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
6
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
7
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
8
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
9
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
10
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
11
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
12
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
13
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
14
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
15
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
16
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
17
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
18
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
19
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

ओखी चक्रीवादळाचा राजकीय सभांना फटका, अमित शहा यांच्या गुजरातमधील 3 रॅली रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 12:36 IST

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ओखी चक्रीवादळाचा फटका राजकीय सभांना बसला आहे.

ठळक मुद्दे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ओखी चक्रीवादळाचा फटका राजकीय सभांना बसला आहे. दक्षिण भारतातील किनारपट्टी भागात थैमान घालणारं ओखी चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरुन पुढे गुजरातकडे सरकत आहे.

अहमदाबाद- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ओखी चक्रीवादळाचा फटका राजकीय सभांना बसला आहे. दक्षिण भारतातील किनारपट्टी भागात थैमान घालणारं ओखी चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरुन पुढे गुजरातकडे सरकत आहे. या वादळाच्या प्रभावामुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी गुजरातमधील नियोजित राजुला, महुवा आणि शिहोर येथील निवडणूक रॅली रद्द केल्या आहेत.

ओखी चक्रीवादळाचे परिणाम मुंबई आणि कोकणामध्ये दिसून येत आहेत.  वादळाचा परिणाम म्हणून सध्या मुंबई आणि कोकणात जोरदार पाऊस सुरु आहे. यापूर्वी या वादळाने तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीप येथे थैमान घातलं होतं. ओखीमुळे या राज्यांचं मोठं नुकसान झालं होतं. 

ओखी चक्रीवादळामुळे केरळ आणि तामिळनाडू राज्यातील २२ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. यामुळे लक्षद्वीपमध्ये भूस्खलनही झालं होतं. केरळ आणि तामिळनाडूतील सुमारे 900 पेक्षा अधिक मच्छिमार या वादळामुळे समुद्रात अडकून पडले होते. त्यानंतर सिंधुदूर्गच्या समुद्रकिनाऱ्यावर ते सुरक्षितरित्या पोहोचलं.ओखी वादळाच्या तडाख्यामुळे मुंबईसह उपनगरात पाऊस पडत आहे. वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सोमवारी संध्याकाळी पाऊस झाला. मंगळवारीही सकाळपासून पाऊस सुरू आहे. 

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळAmit Shahअमित शाहGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017