शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मिशन 2019 साठी 'असा' असणार भाजपाचा मेगा प्लान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 17:26 IST

सर्व 543 लोकसभा मतदारसंघांसाठी भाजपानं आखली योजना

नवी दिल्ली: देशातील सर्वच राजकीय पक्ष आगामी वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. कायम इलेक्शन मोडमध्ये असणारा भाजपा यामध्ये सर्वात आघाडीवर आहे. दिल्लीत 'फिर एक बार मोदी सरकार' आणण्यासाठी भाजपाचं नेतृत्त्व कामाला लागलं आहे. पुन्हा एकदा दिल्ली जिंकण्यासाठी भाजपानं देशातील सर्वच्या सर्व म्हणजेच 543 जागांसाठी मेगा प्लान तयार केला आहे.देशात लोकसभेच्या एकूण 543 जागा आहेत. या प्रत्येक जागेसाठी भाजपा एक प्रभारी नियुक्त करणार आहे. विशेष म्हणजे ज्या मतदारसंघासाठी प्रभारींची नियुक्ती होईल, ते प्रभारी त्या लोकसभा मतदारसंघाच्या बाहेरचे असतील. याशिवाय प्रत्येक राज्यात 11 सदस्यांची एक 'इलेक्शन टीम' असेल. ही टीम 13 विशिष्ट मुद्यांवर लक्ष देईल. 'हिंदुस्तान टाईम्स'नं भाजपाच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे याबद्दलचं वृत्त दिलं आहे. भाजपा अशाप्रकारे पहिल्यांदाच प्रत्येक मतदारसंघामागे एका प्रभारी नेमणार आहे. बहुजन समाज पक्ष कित्येक वर्षांपासून या पद्धतीनं निवडणुकीची योजना आखतो आहे. मोदी-शहा जोडगोळीला 2019 ची लोकसभा निवडणूक 2014 पेक्षा मोठ्या फरकानं जिंकायची असल्याचं भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलं. 'मोदी-शहा संघटनेवर जास्त भर देत आहेत. 2019 च्या पार्श्वभूमीवर मोदी-शहांनी ही सर्व तयारी सुरू केली आहे,' अशी माहिती या नेत्यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेतृत्त्वानं प्रत्येक राज्यातील भाजपा संघटनेला विविध सामाजिक मुद्यांवर आधारित अहवाल तयार करण्याची जबाबदारी दिली आहे. याशिवाय सध्याची राजकीय परिस्थिती, विरोधकांची रणनिती, आघाडीच्या शक्यता, सरकारी योजनांच्या लाभार्थींची यादी अशा विविध मुद्यांची माहितीदेखील भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं मागवली आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहPoliticsराजकारणBJPभाजपाlok sabhaलोकसभा