शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पाच राज्यांतील निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी, भाजपची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 10:46 IST

सहा चिंतन शिबिरांतून होणार केंद्र सरकारच्या निर्णयांची चर्चा

ठळक मुद्देपक्षाकडून प्रत्येक राज्यातील माहिती घेतली जात आहे. संघटन महामंत्री बी. एल. संतोष यांनी उत्तर प्रदेश, अरुण सिंह यांनी उत्तराखंड, दुष्यंत गौतम यांनी पंजाब, सीटी रवि यांनी गोवा आणि दिलीप सेकिया यांनी मणिपूरबाबतीत माहिती दिली

नितीन अग्रवाल / शीलेश शर्मा नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपने या राज्यात संघटना मजबूत करणे आणि प्रलंबित योजना निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्यावर भर दिला आहे.  भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील प्रलंबित विकास योजनांबाबत सातत्याने केंद्रीय मंत्र्यांकडून माहिती घेत आहेत. पक्षाच्या मुख्यालयात शनिवारी नड्डा यांनी केंद्रीयमंत्री राजनाथसिंह, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान आणि किरन रिजिजू यांच्याशी चर्चा केली. 

पक्षाकडून प्रत्येक राज्यातील माहिती घेतली जात आहे. संघटन महामंत्री बी. एल. संतोष यांनी उत्तर प्रदेश, अरुण सिंह यांनी उत्तराखंड, दुष्यंत गौतम यांनी पंजाब, सीटी रवि यांनी गोवा आणि दिलीप सेकिया यांनी मणिपूरबाबतीत माहिती दिली. बूथ आणि मंडळ स्तरावर समितीचे पुनर्गठन करण्याचे निर्देश सर्व राज्यांचे प्रभारी यांना देण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशात कोण कुणासोबत?nउत्तर प्रदेशात कोण कुणासोबत उत्तर प्रदेशात सपा आणि काँग्रेसला बाजूला करण्यासाठी नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील जेडीयूला बिहारमधून उत्तर प्रदेशात आणण्यासाठी भाजप डावपेच आखत आहे. जेणेकरुन, उत्तर प्रदेशातील कुर्मी वोट बँकेला सपा आणि काँग्रेसकडे जाण्यापासून रोखता येईल. जदयूचे नेते के. सी. त्यागी यांनी याला दुजोरा दिला. ते म्हणाले की, जेडीयू भाजपासोबत आघाडी करु शकतो. पण, जेडीयूला किती जागा मिळतील यावर हे अवलंबून आहे.

nअशीही चर्चा आहे की, बसपा प्रमुख मायावती थेट भाजपाशी आघाडी करणार नाहीत. पण, त्यांचा प्रयत्न भाजपासोबत रणनीतीच्या दृष्टीने सुसंगत पाऊल टाकण्याचा आहे. राज्यात बसपाची स्थिती काँग्रेसपेक्षा खराब आहे. तर, कोणताही पक्ष काँग्रेससोबत आघाडी करायला तयार नाही. काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. nकाँग्रेसच्या आशा सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यावरच आहेत. प्रियांका गांधी जुलैपासूनच लखनौमध्ये दाखल होण्याच्या तयारीत आहेत. सपाने राष्ट्रीय लोकदलासोबत आघाडीचा निर्णय घेतला आहे. अल्पसंख्यांक मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेस, सपा आणि बसपा प्रयत्नात आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा