शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

एक्झिट पोलवरुन भाजपा नेत्यांमध्येच कुजबूज; वाढलेल्या आकड्यांवर व्यक्त केला संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 10:19 IST

मेरठमधील एका भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने 23 मे रोजी प्रत्यक्षात निकाल येतील तेव्हा भाजपाच्या जागा कमी होतील अशी चिंता व्यक्त केली आहे. 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकाला अवघे 24 तास शिल्लक आहेत. मात्र त्याआधी विविध वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या एक्झिट पोलमधून एनडीए 300 चा आकडा पार करत बहुमतात सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तविला आहे. टीव्हीवर दाखविणाऱ्या या आकड्यांमुळे भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी खूश असले तरी आरएसएस, भाजपाचे काही ज्येष्ठ नेते आणि प्रत्येक राज्यात प्रचारासाठी गेलेल्या नेत्यांना यावर विश्वास होत नाही. मेरठमधील एका भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने 23 मे रोजी प्रत्यक्षात निकाल येतील तेव्हा भाजपाच्या जागा कमी होतील अशी चिंता व्यक्त केली आहे. 

सरकारी कार्यालयातही आकडेवारीवरुन संशय अनेक मंत्रालयातील केंद्रीय सचिव स्तरावरील अधिकारी निवडणूक सुरु होण्यापासून ग्राऊंडवरील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. एक्झिट पोलच्या आकडेवारीवरुन एनडीएमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनाने तयारीही सुरु केली आहे. लोकसभा निकालांबाबत सामान्य जनतेप्रमाणे ज्येष्ठ अधिकाऱ्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. निवडणुकीत ड्युटी करणाऱ्या अधिकाऱ्यांपासूनही सचिव माहिती घेत आहेत. कायदे मंत्रालयातील एका अधिकाऱ्यानेही सांगितलं की एक्झिट पोलमधील आकडेवारी जास्त प्रमाणात वाढवून सांगितली जात आहे असं वाटतं. गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाही 23 मे रोजी निकाल अनपेक्षित लागू शकतात असं वर्तवलं आहे. 

भाजपाच्या एका नेत्याच्या मते, अनेक स्तरावरुन माहिती घेतल्यानंतर एनडीएसोबत भाजपाला दिल्लीत 5, गुजरात 21, मध्य प्रदेश 18, छत्तीसगड 4, राजस्थान 19, उत्तर प्रदेश 38, बिहार 28, झारखंड 5, पश्चिम बंगाल 11, ओडिशा 8, कर्नाटक 16, हिमाचल प्रदेश 4, उत्तराखंड 4, हरियाणा 6, पंजाब 4, महाराष्ट्र 31, आसामसह पूर्वांचल राज्यात 17, तामिळनाडू 4, गोवा 2, जम्मू काश्मीर 2 आणि चंदिगड 1 अशाप्रकारे भाजपाला जागा मिळेल. जवळपास एनडीएला 248 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपा नेत्यांमध्ये दिवसभर ऑफ द रेकॉर्ड चर्चा सुरु होती. सर्वांनुमते एक्झिट पोलचे आकडे खूप वाढवून दाखवत असल्याचं बोललं जात आहे.   

टॅग्स :Lok Sabha 2019 Exit Pollलोकसभा निवडणूक एक्झिट पोलBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी