शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

MP, छत्तीसगडमधील मतदानापूर्वी भाजपनं खेळलं मोठं कार्ड, केली 'PM जनमन'ची घोषणा, कुणाला होणार लाभ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 16:06 IST

आदिवासी समाजाचे प्रतीक असलेले भगवान बिरसा मुंडा, यांना त्यांच्या जन्मस्थानी जाणून आदरांजली अर्पण केल्यानंतर, त्यांनी या नव्या योजनेची घोषणा केली आणि फायदे सांगितले.

मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचा आखाडा  चांगलाच रंगला आहे. यातच आता, येथील निवडणुकीपूर्वीच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे आदिवासी कार्ड खेळले आहे. आदिवासी समाजाच्या विकासावर लक्ष केंद्रित करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी झारखंडमध्ये 'पीएम जनमन' मोहिमेची घोषणा केली. आदिवासी समाजाचे प्रतीक असलेले भगवान बिरसा मुंडा, यांना त्यांच्या जन्मस्थानी जाणून आदरांजली अर्पण केल्यानंतर, त्यांनी या नव्या योजनेची घोषणा केली आणि फायदे सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, पंतप्रधान जनमन योजनेंतर्गत सरकार, ज्यांच्याकडे आतापर्यंत दुर्लक्ष करण्यात आले, अशा सर्वात मागास आदिवासींपर्यंत पोहोचणार आहे. पीएम जनमन हा विकसित भारताच्या संकल्पाचा एक मुख्य आधार आहे. अर्थात, पीएम आदिवासी महाअभियान आहे. मोदी हिम्मतीने आदिवासी न्याय अभियान घेऊन निघाला आहे. स्वातंत्र्यानंतर, अनेक दशके आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष करण्यात आले. अटलजी सरकारने आदिवासी समाजासाठी स्वतंत्रमंत्रालयाची स्थापना केली आणि बजेट दिले. आता आमच्या सरकारच्या काळात आदिवासी कल्याणचे बजेट पूर्वीच्या तुलनेत सहा पट वाढळे आहे.

22 हजार गावांतील आदिवासींसाठी खर्च होणार 24 हजार कोटी -पंतप्रधान मोदी म्हणाले, पीएम जनमन अंतर्गत सरकार अशा आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचेल, ज्यांच्यापर्यंत अद्यापही पोहोचले गेलेले नाही. हे असे आदिवासी समूह आहेत, ज्यांतील बहुतेकांना अजूनही जंगलात रहावे लागत आहे. या लोकांनी अद्याप ट्रेनही बघितलेली नाही. सरकारने देशातील 22 हजाराहून अधिक गावांमध्ये राहणाऱ्या, अशा 75 आदिवासी समुदायांची ओळख पटवली आहे. 

मोदी म्हणाले, ज्याप्रमाणे मागास लोकांमध्ये अती मागास आहेत. तसेच, आदिवासी समाजातही अती मागे असलेले आदिवासीही आहेत. देशभरात त्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. या अतिमागास आदिवासींना स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. पक्के घर मिळालेले नाही. त्यांच्या अनेक पिढ्यांमध्ये मुलांनी शाळा पाहिली नाही. याच वेळी, भारत सरकार या महाअभियानावर 24 हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

महत्वाचे म्हणजे, 17 नोव्हेंबरला मध्येप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार आहे. यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. संबंधित दोन्ही राज्यांत मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज आहे. निवडणुकीत या समाजाची भूमिकाही महत्वाची ठरते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३chhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३BJPभाजपा