शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपानं आखला २०२४ च्या निवडणुकीचा प्लॅन; 'त्या' १०० जागांवर लक्ष केंद्रीत करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 05:32 IST

भाजपने सुरू केली लोकसभेची तयारी, कमकुवत स्थिती असलेल्या भागांत पकड मजबूत करणार

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : भाजपने आतापासूनच लोकसभेच्या आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.  २०१९ मध्ये ज्या ठिकाणी पक्षाची कमकुवत स्थिती होती, त्या भागात पकड मजबूत करण्यावर भर देत आहे.

भाजपच्य एका वरिष्ठ नेत्याने ‘लोकमत’ ला सांगितले की, निवडक मतदान केंद्रांवर पकड मजबूत करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाईल. यासाठी वरिष्ठ नेत्यांचे दौरे आयोजित केले जातील. पक्षाची पकड सैल का झाली? यामागची कारणे शोधून निवडणुकीपूर्वीच या मतदान केंद्रांवर पक्षाची स्थिती मजबूत केली जाईल. संघटनात्मक स्तरावरील रिक्त पदांची जबाबदारी भक्कम कार्यकर्त्यांवर सोपविली जाईल. मतदारांना पक्षाशी जोडण्यासाठी थेट संपर्कासाठी मतदार यादी पानप्रमुखांना प्राधान्य दिले जाईल. याशिवाय सोशल मीडियाचाही उपयोग केला जाईल.

चार सदस्यांची समिती स्थापनदेशभरातील शंभर लोकसभा मतदार संघांतील ७४ हजार मतदान केंद्रांवर पक्षाची पकड घट्ट करण्यासाठी चार सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याची जबाबदारी बी. जे. पांडा, दिलीप घोष, सरचिटणीस सी. टी. रवी आणि अनुसूचित जाती मोर्चाचे लाल सिंह आर्य यांना देण्यात आली आहे. या मतदान केंद्रांपैकी बहुंशी ठिकाणी अल्पसंख्याक मतदारांची संख्या जास्त आहे. बहुंशी मतदान केंद्रे  भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांतील आहेत. यावेळी  भाजप प. बंगाल, आंध्र प्रदेश, केरळ आणि तमिळनाडू राज्यांवर यावेळी जास्त लक्ष केंद्रित करणार आहे.

टॅग्स :BJPभाजपा