शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या, जम्मू काश्मीरमध्ये का लागू होत नाही राष्ट्रपती राजवट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 09:11 IST

जम्मू-काश्मीरमध्ये आजपासून राज्यपाल शासन लागू झालं आहे

श्रीनगर: जम्मू-काश्मीर सरकारमधून भाजपा बाहेर पडल्यामुळे मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं आहे. भाजपा सत्तेतून बाहेर पडल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यपाल एन. एन. वोहरा यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाली आहे. कोणत्याही पक्षानं सत्ता स्थापनेचा दावा न केल्यास देशातील अन्य राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होते. मात्र जम्मू-काश्मीर याला अपवाद आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कोणत्याही पक्षानं सरकार स्थापनेचा दावा न केल्यानं राज्यपाल राजवट लागू झाली आहे. आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यपाल शासनाला मंजुरी दिली. जम्मू-काश्मीरमध्ये घटनेच्या कलम 92 अंतर्गत राज्यात 6 महिन्यांसाठी राज्यपाल शासन लागू केलं जातं. मात्र यासाठी राष्ट्रपतींची मंजुरी आवश्यक असते. भारताच्या घटनेनं जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा दिला आहे. देशातील अन्य राज्यांमध्ये घटनेच्या कलम 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. मात्र जम्मू-काश्मीरसाठी हे कलम लागू होत नाही. राज्यपाल शासनाच्या अंतर्गत राज्याची विधानसभा निलंबित राहते किंवा भंग केली जाते. जर सहा महिन्यांमध्ये राज्यातील स्थिती सर्वसामान्य झाली नाही, राज्यात निवडणूक झाली नाही, तर मग राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येते. सध्या जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. वोहरा आहेत. जून 2018 मध्ये वोहरा यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर 2013 मध्ये त्यांना मुदतवाढ देण्यात आली. मोदी सरकारनं आतापर्यंत काही मोजक्याच राज्यपालांना पुन्हा संधी दिली आहे. त्यातील वोहरा एक आहेत. वोहरा यांची नियुक्ती काँग्रेस सरकारनं केली होती. मात्र त्यांना मोदी सरकारनं कायम ठेवलं आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाBJP-PDPभाजपा-पीडीपीMehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीPoliticsराजकारण