शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

३ राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या नावाबद्दल भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीत चर्चा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 10:00 IST

दोन उपमुख्यमंत्री करण्याचा विचार, राजस्थानमध्येही वसुंधरा राजे यांच्याशिवाय दिया कुमारी, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुनराम मेघवाल, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही दावेदारी आहे.

संजय शर्मा नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील मोठ्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाने या तीन राज्यांतील भावी मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा सुरू केली आहे. भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत भावी मुख्यमंत्र्यांच्या नावावर चर्चा झाली. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल. संतोषही या बैठकीत उपस्थित होते. तीन राज्यांतील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे नाव ठरवणार आहे. सोशल इंजिनिअरिंग आणि जातीय समीकरण लक्षात घेऊन दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्याचाही विचार सुरू आहे. 

मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हादसिंह पटेल आणि कैलाश विजयवर्गीय हेही मोठे दावेदार मानले जात आहेत. शिवराजसिंह चौहान यांना लोकसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्रिपदी ठेवण्याचीही चर्चा आहे. त्यांना केंद्रातील राजकारणात आणल्यास त्यांची जागा या तिन्ही नेत्यांपैकी कोणीही घेऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नावावर अंतिम शिक्कामोर्तब करायचे आहे. मागासवर्गीय असल्याने केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांचा दावाही भक्कम मानला जात आहे. 

राजस्थानमध्येही वसुंधरा राजे यांच्याशिवाय दिया कुमारी, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुनराम मेघवाल, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही दावेदारी आहे. जातीय समीकरणाच्या दृष्टीने राजस्थानमध्ये दोन उपमुख्यमंत्री केले जाऊ शकतात. त्यापैकी एक अनुसूचित जाती किंवा मागासवर्गीय असू शकतो. छत्तीसगडमध्येही माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांच्याशिवाय प्रदेशाध्यक्ष अरुण साव यांची जोरदार दावेदारी दिसून येत आहे. येथेही भाजपने ओबीसी नेत्याला मुख्यमंत्री केले, तर ते आदिवासी नेत्याला उपमुख्यमंत्री बनवू शकतात. 

दिल्लीहून केंद्रीय निरीक्षक पाठवणार मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपचे केंद्रीय नेतृत्व एक केंद्रीय निरीक्षक पाठवणार आहे. ते विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावून निवडून आलेल्या आमदारांचे मत जाणून घेतील. पुढील दोन दिवसांत भाजप तिन्ही राज्यांमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावेल आणि नवा नेता निवडेल. हे नेते राज्यपालांना भेटतील आणि सरकार स्थापनेचा दावा करतील.

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेशRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक