शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने आमदार फोडण्यासाठी 25 कोटी आणि मंत्रीपदाची ऑफर दिली; AAP आमदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 16:05 IST

AAP आमदार ऋतुराज झा यांनी भाजपवर मोठा धमकावल्याचा आरोपही केला आहे.

नवी दिल्ली:दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आप आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा फेऱ्या सुरू झाल्या आहेत. अशातच, आपचे दिल्लीतील किरारी विधानसभेचे आमदार ऋतुराज झा यांनी मोठा दावा केला आहे. भाजपने आम आदमी पक्षाचे आमदार फोडून भाजपमध्ये येण्यासाठी 25 कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा दावा त्यांनी केला. यासोबतच त्यांनी भाजपवर धमकावल्याचा आरोपही केला आहे. ऋतुराज झा यांना ज्या नंबरवरुन कॉल करुन ही ऑफर दिली, तो नंबरदेखील त्यांनी सांगितला. 

‘आमदार फोडण्यासाठी 25 कोटींची ऑफर’दिल्ली विधानसभेत बोलताना आमदार ऋतुराज झा म्हणाले की, रामलीला मैदानावरील रॅलीनंतर मी बवाना येथील एका लग्न समारंभात गेलो होतो. तिथे तीन-चार जणांनी मला बाजुला नेले आणि म्हणाले की, तुम्हाला आम्ही अनेक दिवसांपासून समजावण्याचा प्रयत्न करत आहोत. दिल्लीमध्ये आत काहीही मिळणार नाही. दिल्लीत लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे. आपच्या 10 आमदारांना सोबत घेऊन या, आम्ही प्रत्येकाला 25 कोटी रुपये देऊ आणि भाजपचे सरकार आल्यावर तुम्हाला मंत्रीपद देऊ, अशी ऑफर भाजपने दिल्याचा दावा झा यांनी केला आहे.

‘दिल्लीत राष्ट्रपती राजवट’झा पुढे म्हणाले की, त्यांनी मला आपच्या इतर आमदारांशी बोलणी करण्यास सांगितले. मी असे करण्यास नकार दिल्यावर म्हणाले की, दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल आणि भाजपचे सरकार स्थापन होईपर्यंत ही लागू राहील. आता झा यांनी याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाकडून असे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही फेब्रुवारीमध्ये अशा प्रकारचे आरोप केले होते.

 

टॅग्स :AAPआपBJPभाजपाdelhiदिल्लीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Politicsराजकारण