शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

गौरी लंकेश हत्येत सहभागाचा आरोप करणाऱ्या गुहांना भाजपाची नोटीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 02:52 IST

बंगळुरु, दि. १२ - गौरी लंकेश यांच्या हत्येला आठवडा पूर्ण होत आला तरी त्यांच्या हत्येनंतर सुरू झालेले वाद आणि आरोप- प्रत्यारोपाचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांना भाजपाने आता नोटीस बजावली आहे. लंकेश यांच्या हत्योमध्ये भाजपा आणि संघाचा कथित सहभाग असल्याचा आरोप रामचंद्र गुहा यांनी रिपब्लिक टीव्हीशी ...

बंगळुरु, दि. १२ - गौरी लंकेश यांच्या हत्येला आठवडा पूर्ण होत आला तरी त्यांच्या हत्येनंतर सुरू झालेले वाद आणि आरोप- प्रत्यारोपाचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांना भाजपाने आता नोटीस बजावली आहे. लंकेश यांच्या हत्योमध्ये भाजपा आणि संघाचा कथित सहभाग असल्याचा आरोप रामचंद्र गुहा यांनी रिपब्लिक टीव्हीशी बोलताना केला होता. रानचंद्र गुहा यांच्या या आरोपामुळे कर्नाटक भाजपा  युवा मोर्चाच्या सरचिटणिसांनी ही नोटीस बजावली आहे. तसेच राहुल गांंधी यांनीही आरोप पुराव्यासकट करावेत, असे भाजपाने म्हटले आहे. लंकेश यांच्या हत्येनंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रा.स्व. संघ आणि भाजपाविरोधात बोलणार्या प्रत्येकावर दबाव आणला जातो किंवा मारझोड केली जाते किंवा सरळ संपवलेही जाते असे वक्तव्य केले होते. यावर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व खासदार बी.एस. येडियुरप्पा यांनी जर आपले आरोप सिद्ध करणारे पुरावे राहुल यांच्याकडे असतील तर ते त्यांनी सरळ समोर मांडावेत असे आवाहन गांधी यांना केले आहे. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्यावर स्पष्ट शब्दांमध्ये ८ सप्टेंबर रोजी टीका केली होती. गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर रोजी त्यांच्या बंगळुरु येथिल राहत्या घरी मारेकर्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांच्या हत्येनंतर मारेकरी कोण असावेत यावर विविध तर्कवितर्क लढवले जात असून डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. लंकेश यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांच्या हत्येनंतर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. या हत्येचा तपास करण्यासाठी कर्नाटक सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. 

टॅग्स :BJPभाजपाGauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणKarnatakकर्नाटक