शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

'सबका साथ, सबका विश्वास' नव्हे तर भाजपाने सबका सर्वनाश केला; ममतांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 16:14 IST

जोपर्यंत भाजपा नव्हती तोपर्यंत देशात शांती होती. मात्र आज भाजपा सत्तेत आहे. काश्मीर पेटलंय. त्रिपुरा पेटलं.

नवी दिल्ली -  सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जहरी टीका केली आहे. भाजपा देशात दंगली भडकविण्याचा प्रयत्न करते, मात्र आम्ही तसं होऊ देणार नाही. भाजपाने सबका साथ, सबका विश्वास असा नारा दिला पण प्रत्यक्षात सबका सर्वनाश केला अशी टीका ममता बॅनर्जी यांनी भाजपावर केली आहे. 

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात कोलकाताच्या हावडा मैदानात आयोजित केलेल्या रॅलीत त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, गृहमंत्री अमित शहांना त्यांचे काम समजलं पाहिजे, त्यांचे काम देशात तणाव निर्माण करणे नाही. जर सुधारित नागरिकत्व कायद्याला देशात विरोध होत असेल तर हा कायदा लागू होणारच अशी भाषा का वापरता? तुम्हाला पाहिजे तेवढे जेल बनवा, कॅम्प बनवा असा इशाराही त्यांनी केंद्र सरकारला दिला. 

तसेच जोपर्यंत भाजपा नव्हती तोपर्यंत देशात शांती होती. मात्र आज भाजपा सत्तेत आहे. काश्मीर पेटलंय. त्रिपुरा पेटलं, अमित शहा हे फक्त भाजपा नेते नाहीत तर देशाचे गृहमंत्री आहेत हे तुमच्या लक्षात राहुद्या. तुम्ही सबका सर्वनाश केला आहे. शहा सांगतात आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही मग सगळ्या गोष्टी आधार कार्डशी लिंक का केल्या? असा सवाल ममता बॅनर्जींनी अमित शहांना केला आहे. दरम्यान, जे लोक दावा करत आहेत की, एनआरसी आणि सीएए हा कायदा देशातील नागरिकांना नाही पण त्यांना माहित असावं की, हे दोन्ही कायदे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. हा कायदा बंगालमध्ये लागू होणार नाही. या कायद्याविरोधात लोकांनी एकजूट व्हावं असं आवाहन ममता बॅनर्जींनी लोकांना केलं आहे. 

त्याचसोबत तुम्हाला माझं सरकार बरखास्त करायचं असेल, तर खुशाल बरखास्त करा. पण मी बंगालमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ममता बॅनर्जींनी घेतला आहे. त्यांना वाटतं ममता बॅनर्जी एकट्या आहेत. मात्र आता माझ्यासोबत कित्येक जण आहेत. तुमचा हेतू चांगला असेल, तर जनता तुमच्या सोबत असते, असं त्या जनसभेला संबोधित करताना म्हणाल्या. ही धर्मासाठीची लढाई नाही, तर हक्कांसाठी चाललेला संघर्ष असल्याचं त्यांनी म्हटलं.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीBJPभाजपाAmit Shahअमित शहा