शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप हा उत्तर भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 04:42 IST

भाजप हा हिंदीभाषिक राज्यांतील पक्ष असल्याची टीका राजकीय विश्लेषक सातत्याने करीत असतात.

वाराणसी : भाजप हा हिंदीभाषिक राज्यांतील पक्ष असल्याची टीका राजकीय विश्लेषक सातत्याने करीत असतात. पण आम्ही यंदा कर्नाटकात मोठे यश मिळवले आहे. एवढेच नव्हे, तर गोवा, ईशान्य भारत तसेच आसाममध्ये आमची सरकारे आहेत. आमचा प्रभावही देशभर आहे. तरीही भाजपला हिंदी राज्यांतील पक्ष म्हणणे चुकीचे आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे काढले.त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, राजकीय पंडित निवडणुकांची केमिस्ट्री मांडत असतात. पण या केमिस्ट्रीवर भाजपने आपल्या गणिताद्वारे मात केली आहे. मात्र समाजशक्ती, आदर्श व संकल्पाचे जे रसायन आहे ते कधीकधी ठोकळ गुणाकार, भागाकारांनाही पराभूत करते. हे सत्य लोकसभा निवडणुकांच्या निकालांनंतर राजकीय निरीक्षकांनी मान्य करायला हरकत नाही. भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमुळे आम्हाला हा विजय मिळाला आहे.भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची त्यांच्या विचारसरणीमुळे त्रिपुरा, केरळ, पश्चिम बंगालमध्ये हत्या केली जात आहे, असा आरोप मोदी यांनी सोमवारी केला. अमेठीतील भाजपच्या विजयी उमेदवार स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांच्या हत्येच्या निमित्ताने त्यांनी हा उल्लेख केला. मी देशासाठी पंतप्रधान आहे. पण या शहरातील जनतेसाठी मात्र मी खासदार म्हणजेच एक सेवक आहे आणि सेवक म्हणूनच जनतेची कामे करेन.मोदी यांचे विमानतळावर उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी स्वागत केले. त्यांचे वाराणसीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. वाराणसीमध्ये मोदींना निकटच्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा पाच लाख मते जास्त मिळाली आहेत.लोकसभा निवडणुकांनंतर मी वाराणसीत येईन, असे मतदारांना दिलेले आश्वासन मोदी यांनी पूर्ण केले. गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीचा कायापालट केला, असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा आपल्या भाषणात म्हणाले. ते म्हणाले की, मोदींसारखा खासदार मिळणे हे मतदारांचे भाग्य आहे.या मेळाव्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही भाषण झाले. (वृत्तसंस्था)>काशी विश्वेश्वराचे घेतले दर्शनलोकसभा निवडणुकांत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शनही घेतले. त्यांच्यासमवेत योगी आदित्यनाथ व अमित शहा हेही होते. सुमारे एक तास ते मंदिरात होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९