शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशात गमावलेल्या जागांवर दिग्गज नेत्यांना भाजपाकडून उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 12:01 IST

मध्य प्रदेशात भाजपची रणनीती

संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशातील संभाव्य पराभवाचे विजयात रुपांतर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हादसिंह पटेल आणि फग्गनसिंह कुलस्ते, चार विद्यमान खासदार गणेश सिंह, रीती पाठक, उदय प्रताप सिंह, राकेश सिंह आणि भाजप राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांना तिकीट दिले आहे. 

मध्य प्रदेशातील २० वर्षांच्या सत्तेमुळे तयार झालेला सत्ताविरोधी वातावरण आणि संभाव्य पराभवाचा धोका ओळखून भाजपने सोमवारी आपल्या सर्व वरिष्ठ नेत्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करताना अनेक आश्चर्यकारक निर्णय घेतले आहेत. मध्य प्रदेशात भाजपच्या सहा मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांना विधानसभेची तिकिटे देण्यात आली आहेत.केंद्रीय कृषिमंत्री आणि मध्य प्रदेशातील भाजपच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री तोमर यांना दिमनी येथून, पटेल यांना नरसिंहपूरमधून, कुलस्ते यांना निवासमधून आणि विजयवर्गीय यांना इंदूरमधून तिकीट देण्यात आले आहे.

भाजपचे खासदार गणेश सिंह यांना सतना, रीती पाठक यांना सिधी, राकेश सिंह यांना जबलपूर पश्चिम आणि उदय प्रताप सिंह यांना गदरवाडामधून तिकीट देण्यात आले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने या सर्व जागा मोठ्या फरकाने गमावल्या होत्या. भाजपने आपले तगडे उमेदवार उभे करून या सर्व जागा जिंकण्याचा निर्धारच व्यक्त केला आहे. 

दुसऱ्या यादीतही शिवराज नाहीतभाजपच्या दुसऱ्या यादीत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना तिकीट मिळाले नाही. सर्व सत्ताविरोधी वातावरणाचे मुद्दे देखील चौहान यांच्याशी संबंधितच असल्यामुळे भाजपला निवडणुकीत अडचणी येत आहेत.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूक