शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

भाजपाचे राष्ट्रीय 'महामंथन', PM नरेंद्र मोदी देणार विजयाचा मंत्र, राम मंदिराचा प्रस्ताव मांडणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 10:50 IST

BJP National Council meet : भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन शनिवारपासून सुरू होणार असून रविवारपर्यंत चालणार आहे.

BJP National Council meet  (Marathi News)नवी दिल्ली : देशात आतापासून आगामी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीच्या आठवड्यात आचार संहिता लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षांनीही तयारी सुरू केली आहे. यादरम्यान भाजपाचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत सुरू होणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदीही या अधिवेशनाला उपस्थित राहणार असून पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदी भाजपाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीतील विजयाचा मंत्रही देतील. तसेच, या अधिवेशनात दोन प्रस्तावही मांडले जाणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. लोकसभा निवडणूक-2024 मध्ये भाजपाने 370 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन शनिवारपासून सुरू होणार असून रविवारपर्यंत चालणार आहे. अधिवेशनात प्रामुख्याने लोकसभा निवडणूक-2024 च्या रणनीतीवर विचारमंथन होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत होणार आहे. भाजपाचे हे राष्ट्रीय अधिवेशन दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. या अधिवेशनात इतर मुद्द्यांवर चर्चेसोबतच मोदी सरकारच्या कार्यकाळातील कामगिरीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. हे राष्ट्रीय अधिवेशन दोन दिवस चालणार आहे.

दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू होत आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, राष्ट्रीय बैठकीत दोन प्रस्ताव मांडले जाऊ शकतात. पहिला राम मंदिर आणि दुसरा प्रस्ताव विकसित भारत : मोदींची गॅरंटीवर असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अनेक सभांमध्ये या गॅरंटीचा उल्लेख केला आहे. दुसरीकडे अयोध्येत राम मंदिराचे औपचारिक उद्घाटन झाले आहे. जानेवारी महिन्यात एका भव्य कार्यक्रमात अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिरात प्रभू रामललाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

अधिवेशनापूर्वी पदाधिकाऱ्यांची बैठकभाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी आणि प्रवक्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. तसेच, नरेंद्र मोदी प्रगती मैदानावर असलेल्या भारत मंडपममध्ये जातील, जिथे मोदी सरकारच्या विकास प्रवासावर एक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात गेल्या १० वर्षांचा विकास प्रवास दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएसाठी ४०० जागांचे लक्ष्य ठेवले आहे, तर भाजपासाठी ३७० जागांचे लक्ष्य ठेवले आहे. 

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीJ P Naddaजगत प्रकाश नड्डाPoliticsराजकारण