शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

"काँग्रेसचे अस्तित्व व्हेंटिलेटरवर आणि नेत्यांचा मूर्खपणा एक्सेलरेटरवर"; भाजपाचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 20:00 IST

BJP Mukhtar Abbas Naqvi And Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी जोरदार हल्लाबोल करत पलटवार केला आहे. 

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठातून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला होता. "काँग्रेसला पूर्वीसारखा भारत मिळवायचा आहे. त्यासाठी आम्ही लढतोय. तर भाजपा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे" असं राहुल गांधी म्हणाले. तसेच चीन बाबत बोलतानाही राहुल गांधी यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर आता भाजपाने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी (BJP Mukhtar Abbas Naqvi) यांनी हल्लाबोल करत पलटवार केला आहे. 

"काँग्रेसचे अस्तित्व व्हेंटिलेटरवर आणि नेत्यांचा मूर्खपणा एक्सेलरेटरवर" असं म्हटलं आहे. तसेच काँग्रेस नेते परदेशात जाऊन देशाची बदनामी करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. "काँग्रेसच्या या विकार धारेने एकेकाळी देशाचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणार्‍या पक्षाची अशी अवस्था केली आहे की तो आता परिसरातही नाही. आज काँग्रेसचं अस्तित्व व्हेंटिलेटरवर आहे, तर त्यांच्या नेत्यांचा मूर्खपणा एक्सेलरेटरवर आहे. काँग्रेस नेते परदेशात जाऊन भारताची बदनामी करतात. भारताची तुलना पाकिस्तान, श्रीलंका किंवा इतर कोणत्याही देशाशी करतात" असं मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

“पूर्वीसारखा भारत परत मिळवण्यासाठी आमचा पक्ष लढत आहे. परंतु भाजपाकडून लोकांचा आवाज दाबला जातो. आम्ही लोकांचा आवाज ऐकण्यासाठी काम करत आहोत,” असं राहुल गांधी म्हणाले होते. ज्यांनी देशाच्या निर्मितीचं काम केलं, त्या संस्थांवर हल्ले होत आहेत, त्यावर डीप स्टेटचा कब्जा असल्याचंही ते म्हणाले होते. “काँग्रेसची ही लढाई आता वैचारिक लढाई आहे. ही एक राष्ट्रीय वैचारिक लढाई आहे. भाजप आणि संघाला भारत एक भूगोलाप्रमाणे दिसत आहे. परंतु काँग्रेससाठी भारत हा लोकांनी बनतो,” असं ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेसला अंतर्गत कलह, पक्ष बदल आणि निवडणूकांमध्ये पराभव अशा गोष्टांना सामना करावा लागत असल्याचंही त्यांनी मान्य केलं.

“भाजपा सरकारच्या काळात रोजगार कमी झाले आहेत. असं असूनही ध्रुवीकरणामुळे ते सत्तेत राहिलेत. आज भारतात परिस्थिती चांगली नाही. भाजपाने चहुबाजूंना रॉकेल शिंपडले आहे,” असंही राहुल गांधी म्हणाले होते. आमच्याकडे एक असा भारत आहे, जेथे निरनिराळे विचार मांडता येतील आणि आपण चर्चाही करू शकतो, असंही त्यांनी सांगितलं. “प्रत्येक संस्थांवर सरकारचा कब्जा झाला आह. प्रत्येक संस्थांवर हल्ला केला जात आहे. आमच्याकडे भाजपासारखा उमेदवार आहे असं लोक म्हणतात. जर आपण भाजपासारखा उमेदवार आहे असं म्हटलं तर आपण भाजपाच होऊ. भाजपा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही सर्वांचा आवाज ऐकतो. आम्ही लोकांना ऐकण्यासाठी आहोत,” असं लोकशाही विषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले होते.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण