भाजपाच्या खासदार पडल्या आठ फूट खोल नाल्यात
By Admin | Updated: May 17, 2016 04:39 IST2016-05-17T04:39:33+5:302016-05-17T04:39:33+5:30
गुजरातच्या जामनगरच्या भाजपाच्या खासदार पूनम मादन सोमवारी सकाळी गटारात पडून जखमी झाल्या.

भाजपाच्या खासदार पडल्या आठ फूट खोल नाल्यात
जामनगर : गुजरातच्या जामनगरच्या भाजपाच्या खासदार पूनम मादन सोमवारी सकाळी गटारात पडून जखमी झाल्या. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पूनम सकाळी झोपडपट्टीधारकांना भेटण्यास गेल्या. सिमेंटचे झाकण असलेल्या गटारावर उभे राहून अतिक्रमण हटाव पथकासोबत बोलत होत्या. या गटाराचे झाकण अचानक तुटले आणि त्या आठ फूट खोल गटारात पडल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला चार इंच खोल जखम झाली. खांदा आणि पायालाही मार बसला आहे. त्यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रूग्णालयात दाखल केले आहे.