सुनेच्या पुनर्विवाहात भाजपा खासदाराने दिली १०० कोटींची मालमत्ता भेट

By Admin | Updated: September 26, 2014 17:26 IST2014-09-26T17:25:06+5:302014-09-26T17:26:36+5:30

भारतीय जनता पक्षाच्या खासदाराने सुनेच्या पुनर्विवाहात भेट म्हणून १०० कोटी रुपयांची मालमत्ता दिली आहे.

BJP MP's assets worth Rs 100 crores in Sun's remarriage | सुनेच्या पुनर्विवाहात भाजपा खासदाराने दिली १०० कोटींची मालमत्ता भेट

सुनेच्या पुनर्विवाहात भाजपा खासदाराने दिली १०० कोटींची मालमत्ता भेट

>ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. २६ - भारतीय जनता पक्षाच्या खासदाराने सुनेच्या पुनर्विवाहात भेट म्हणून १०० कोटी रुपयांची मालमत्ता दिली आहे. पोरबंदर येथील भाजपा खासदार व शेतकरी समाजाचे नेते असलेल्या विठ्ठल रदादिया यांच्या सुनेचा आज (शुक्रवार) विवाह असून त्यांनी १०० कोटी रुपयांची मालमत्ता तिच्या नावावर केली आहे. 
विठ्ठल रदादिया यांचा मुलगा कल्पेश याचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुलं आहेत. मुलाच्या निधनानंतर सुनेने पुनर्विवाह करावा अशी विठ्ठल रडादिया यांची इच्छा होती अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयाने दिली. त्यानुसार, त्यांच्या सुनेचा रदादिया यांच्या मुलाच्या मित्राशी आज विवाह होत आहे. या पुनर्विवाहात रदादिया यांनी त्यांच्या सुनेचे कन्यादान करत १०० कोटी रुपयांची मालमत्ता तिच्या नावे करुन एक नवा आदर्श ठेवला आहे.  
 

Web Title: BJP MP's assets worth Rs 100 crores in Sun's remarriage