शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील औरंगजेब रोडचे नाव बदलणाऱ्या भाजपा खासदाराला शौर्य पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 10:07 IST

या कार्यक्रमाचे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार होते.

नवी दिल्ली: दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे नामांतर करणारे खासदार महेश गिरी यांना शुक्रवारी शिवाजी पुरस्काराने गौरवण्यात आले. पूर्व दिल्ली मतदारसंघाचे खासदार असलेल्या गिरी यांनी काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे नाव बदलून त्याला डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव दिले होते. त्यांच्या या शौर्यपूर्ण कामगिरीची दखल घेत गिरी यांना शिवाजी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्लीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार होते. मात्र, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे ते कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणात गिरी यांनी म्हटले की, आजच्या काळाचा संदर्भ लावायचा झाल्यास औरंगजेब हा एक दहशतवादी होता. मी प्रत्येकवेळी औरंगजेब रोडवरून जायचो तेव्हा माझ्या मनाला खूप यातना होत असत. औरंगजेबाच्या राजवटीत भारतीय संस्कृतीचा विनाश करण्यात आला. अनेक निरपराध लोकांची हत्या करण्यात आली. तरीदेखील दिल्लीतील रस्त्याला अशा राज्यकर्त्याचे नाव का दिले?, असा प्रश्न मला पडायचा. त्यामुळे मी या रस्त्याचे नाव बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हे सर्व सुरू असताना मला अनेक धमक्याही देण्यात आल्याचे गिरी यांनी सांगितले. गिरी यांच्या पाठपुराव्यानंतर नवी दिल्ली महानगरपालिकेने 28 ऑगस्ट 2015 रोजी या रस्त्याचे नाव बदलले होते.

टॅग्स :BJPभाजपा